टी-१० लीगमध्ये फिक्सिंग?

टी-१० लीगमध्ये फिक्सिंग?

दुबई : वृत्तसंस्था : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेेने (आयसीसी) 2021 च्या एमिरेटस टी-10 लीगमधील आठ खेळाडू आणि अधिकार्‍यांसोबत दोन भारतीय संघ मालकांवर भ्रष्ट हालचालीत सहभागी असल्याचा आरोप केला आहे. पराग संघवी आणि कृष्णकुमार अशी या संघ मालकांची नावे असून, ते दोघे पुणे डेव्हिल्स संघाचे सहमालक आहेत. यांच्या संघातील एक खेळाडू आणि बांगलादेशचा माजी कसोटीपटू नासिर हुसैन याच्यावरही भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

या भ्रष्ट प्रकरणात सहभागी असलेल्या तिसर्‍या व्यक्तीचे नाव सन्नी ढिल्लो असून, तो फलंदाजी प्रशिक्षक आहे. आयसीसीने म्हटले आहे की, 2021 आबुधाबी टी-10 क्रिकेट लीग आणि सामन्यांना भ्रष्ट करण्याबाबतचे हे आरोप असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.

संघवी याच्यावर सामन्याचे निकाल आणि अन्य बाबीसंदर्भात सट्टा लावण्याचे आणि चौकशी यंत्रणेला सहकार्य न करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. तर कृष्णकुुमार याच्यावर डीएसीओपासून काही लपवल्याचा आरोप आहे.

बांगलादेशसाठी 19 कसोटी आणि 65 एकदिवसीय सामने खेळणार्‍या नासिरवर अधिकार्‍यांपुढे 750 डॉलर्सहून अधिक किमतीच्या गिफ्टची माहिती न दिल्याचा आरोप ठेवला आहे. या सर्वांना आरोपांचा खुलासा करण्यासाठी मंगळवारपासून 19 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news