IPL 2024 : कोलकातासमोर हैदराबादचे 114 धावांचे आव्हान

IPL 2024 : कोलकातासमोर हैदराबादचे 114 धावांचे आव्हान
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत हैदराबाद संघाने 18.3 षटकांत 10 गडी गमावून केवळ 113 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2013 मध्ये चेन्नईने मुंबईला 125 धावांचे लक्ष्य दिले होते.

हैदराबादच्या डावाची सुरूवात खराब झाली. अभिषेक शर्मा दोन धावा तर, ट्रॅव्हिस हेड खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यापुढे हैदराबाद गडगडला. राहुल त्रिपाठी 9, एडन मार्कराम 20, नितीशकुमार रेड्डी 13, हेनरिक क्लासेन 16, शाहबाज अहमद 8, अब्दुल समद 4, पॅट कमिन्स 24, जयदेव उंडकट 4 धावा केल्या. तर भुवनेश्वर कुमार खाते न उघडता नाबाद राहिला.

कोलकाताकडून आंद्रे रसेलने तीन तर स्टार्क आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय वैभव अरोरा, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

अपडेट्स :

पहिल्याच ओव्हरमध्ये हैदराबादला झटका; अभिषेक शर्मा बाद

अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची सुरूवात खरबा झाली. डावाच्या पहिल्याच ओव्हरच्यया पाचव्या बॉलवर मिचेल स्टार्कने अभिषेक शर्माला क्लीन बोल्ड करत हैदराबादला पहिला झटका दिला. अभिषेक शर्माला आपल्या खेळीत 5 बॉलमध्ये केवळ 2 धावांची खेळी करता आली.

ट्रॅव्हिस हेड भोपळा न फोडता माघारी

सामन्यातील दुसऱ्या ओव्हरच्या सहाव्या बॉलवर ट्रॅव्हिस हेडच्या रूपात हैदराबादचा दुसरा फलंदाज बाद झाला. त्याला कोलकाताचा गोलंदाज वैभव अरोराने गुरबाजकरवी झेलबाद केले. विस्फोटक फलंदाज हेडला आपल्या खेळीत भोपळाही फोडता आला नाही. डावाच्या पहिल्याच बॉलवर तो बाद झाला.

हैदराबाद बॅकफुटवर; 3 बाद 21

सामन्याच्या पाचव्या ओव्हरमध्ये राहूल त्रिपाठीच्या रूपात तिसरा फलंदाज बाद झाला. त्याला कोलकाताचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने रमनदीप सिंगकरवी झेलबाद केले. त्रिपाठीने आपल्या खेळीत 13 बॉलमध्ये 9 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 1 चौकार लगावला. यावेळी त्याने एडन मार्करमसोबत तिसऱ्या विकेटसाठी 14 बॉलमध्ये 15 धावांची खेळी केली.

हैदराबादला चौथा धक्का; नितेश रेड्डी बाद

नितेश रेड्डीला बाद करत हर्शित राणाने हैदराबादला चौथा धक्का दिला. डावाच्या सातव्या ओव्हरमध्ये राणाने रेड्डीला गुरबाजकरवी झेलबाद केले. नितेश रेड्डीने आपल्या खेळीत 10 बॉलमध्ये 13 धावांची खेळी केली.

हैदराबादचा निम्मा संघ तंबूत; एडन मार्करम बाद

डावाच्या 11व्या ओव्हरमध्ये आंद्रे रसेलने मिचेल स्टार्ककरवी एडन मार्करमला बाद करत हैदरबादला पाचवा धक्का दिला. यामुळे एका बाजूने विकेट पडत असताना धावफलक खेळता ठेवणारा मार्करम बाद झाल्याने हैदराबादचा संघ बॅकफुटवर गेला. मार्करमने आपल्या खेळीत 23 बॉलमध्ये 20 धावांची खेळी केली.

हैदराबादचा पाय खोलात; 6 बाद 71

मिथुन चर्कवर्तीने शाहबाज अहमदला बाद करत हैदराबादला सहावा झटका दिला. डावाच्या 12 व्या ओव्हरमध्ये चर्कवर्तीने सुनील नरेनकरवी अहमदला झेलबाद केले. अहमदने आपल्या खेळीत 7 बॉलमध्ये 8 धावांची खेळी केली.

हैदराबादला सातवा धक्का ; अद्बुल समद बाद

सामन्याच्या 13 व्या ओव्हरमध्ये आंद्रे रसेलने गुरबाजकरवी अद्बुल समदला बाद केले. समदने आपल्या खेळीत 4 बॉलमध्ये 4 धावांची खेळी केली.

हेन्रिच क्लासेन बाद; हैदराबाद 8 बाद 90

सामन्याच्या 15 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर क्लासेनच्या रूपात हैदराबादला आठवा झटका बसला. त्याला कोलकाताचा गोलंदाज हर्षित राणाने क्लीन बोल्ड केले. क्लासेनने आपल्या खेळीत 17 बॉलमध्ये 16 धावांची खेळी केली.

हैदराबादला नववा झटका; जयदेव उंडकट बाद

जयदेव उंडकटच्या रूपाने हैदराबादला नववा धक्का बसला. त्याला सुनील नरेनने एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला चार धावा करता आल्या. भुवनेश्वर कुमार ११व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी कमिन्स आहे.

हैदराबादचा डाव गुंढाळला; पॅट कमिन्स बाद

सामन्याच्या 19 व्या ओव्हमध्ये रसेलने हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला मिचेल स्टार्ककरवी झेलबाद करत हैदराबादला 113 धावांवर रोखले. कमिन्सने आपल्या खेळीत 19 बॉलमध्ये 24 धावांची खेळी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news