

पुढारी ऑनलाईन डेस्क : हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (HCA) आयपीएल सामन्यांच्या विनामूल्य तिकिटांसाठी जबरदस्ती करत असून आम्हाला धमकावले जात आहे, असा आरोप सनरायझर्स हैदराबाद (SRH) फ्रँचायझीने केला आहे.
IPL 2025 मधील सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात विशाखापट्टणम येथे होणाऱ्या सामन्यापूर्वी एक अनपेक्षित वळण आले आहे. एसआरएच फ्रँचायझीचे एक पत्र समोर आले असून, त्यामध्ये हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (HCA) सोबत सुरू असलेल्या वादाची गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या पत्रानुसार, HCA कडून फ्रँचायझीवर सातत्याने छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी सनरायझर्सचे जनरल मॅनेजर श्रीनाथ टी.बी. यांनी हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (HCA)चे कोषाध्यक्ष सी.जे. श्रीनिवास राव एक ई-मेल पाठवला आहे, ज्यामध्ये त्यांनी ‘एचसीएकडून मिळत असलेली अशी वागणूक सहन केली जाणार नाही,’ असा इशारा दिला आहे. ‘जर एचसीएला आमचा संघ या स्टेडियममध्ये खेळू नये असे वाटत असेल, तर त्यांनी बीसीसीआय आणि तेलंगणा सरकारला याबाबत लिखित स्वरूपात कळवावे. फ्रँचायझी हे मैदान सोडून इतरत्र जाण्यास तयार आहे,’ असेही स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे, HCA कडून दिल्या गेलेल्या धमक्यांवर कारवाई करण्याची मागणीही श्रीनाथ यांनी केली आहे.
‘आम्ही गेल्या 12 वर्षांपासून HCA सोबत काम करत आहोत. मात्र, मागील हंगामापासूनच आम्हाला HCA कडून सातत्याने अडचणी आणि छळाला सामोरे जावे लागत आहे,’ असा आरोप श्रीनाथ यांनी ई-मेलमध्ये केला आहे.
‘आम्ही गेल्या 12 वर्षांपासून HCA सोबत काम करत आहोत. मात्र, मागील हंगामापासूनच आम्हाला HCA कडून सातत्याने अडचणी आणि छळाला सामोरे जावे लागत आहे,’ असा आरोप श्रीनाथ यांनी ई-मेलमध्ये केला आहे.
HCA सोबतच्या व्यवस्थेचा उल्लेख करत श्रीनाथ यांनी ई-मध्ये म्हटलंय की, श्रीनाथ यांनी ई-मेलमध्ये हेही नमूद केले की, गेल्या काही वर्षांपासून आम्ही HCA ला F12A बॉक्समधील 50 विनामूल्य तिकिटे देत आलो आहोत, जी 3,900 कॉम्प्लिमेंटरी तिकिटांचा भाग आहेत. मात्र, यावर्षी HCA ने या बॉक्सची क्षमता फक्त 30 असल्याचे सांगितले आणि अतिरिक्त 20 विनामूल्य तिकिटांची मागणी केली. जेव्हा आम्हाला याबाबत समजले, तेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली.
श्रीनाथ यांनी पुढे लिहिलंय की, ‘आम्ही स्टेडियमचे भाडे नियमीत भरत आहोत. पण मागील सामन्यावेळी HCA ने F3 बॉक्सला टाळे ठोकले आणि कळवले की, जोपर्यंत त्यांना 20 अतिरिक्त विनामूल्य तिकिटे मिळत नाहीत, तोपर्यंत F3 बॉक्स बंदच राहिल. अशा प्रकारची वागणूक आम्ही सहन करणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. HCA सोबत झालेल्या करारानुसार, 10 टक्के विनामूल्य तिकिटे देण्याची अट आहे. म्हणूनच, आम्ही अपेक्षा करतो की एपेक्स कौन्सिलचे सदस्य तातडीने हस्तक्षेप करतील आणि यावर योग्य कारवाई करतील.’