Hardik Pandya : हार्दिक पंड्याचा राजेशाही थाट..! ४० दिवसांत खरेदी केल्या कोट्यवधींच्या ३ आलिशान कार

Hardik Pandya : हार्दिक पंड्याचा राजेशाही थाट..! ४० दिवसांत खरेदी केल्या कोट्यवधींच्या ३ आलिशान कार
Published on
Updated on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएल २०२६ मधील स्टार परफॉर्मर हार्दिक पंड्या सध्या त्याच्या मैदानातील कामगिरीसोबतच मैदानाबाहेरील राजेशाही जीवनशैलीमुळे चर्चेत आला आहे. कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक असलेल्या हार्दिकने गेल्या ४० दिवसांत आपल्या जवळच्या व्यक्तींवर प्रेमाचा वर्षाव करत तब्बल तीन महागड्या गाड्यांची खरेदी केली आहे. यामध्ये त्याने स्वतःसाठी कार खरेदी करण्यासोबतच आपली माजी पत्नी आणि मैत्रिणीलाही कोट्यवधींच्या अलिशान कार्स भेट दिल्या आहेत.

माजी पत्नी आणि मुलासाठी ४ कोटींची 'लँड रोव्हर'

हार्दिक पंड्याच्या या विलासी जीवनशैलीची झलक २२ फेब्रुवारी रोजी पाहायला मिळाली, जेव्हा त्याने त्याची माजी पत्नी नताशा स्टेनकोविक आणि मुलगा अगस्त्य यांच्यासाठी ४ कोटी रुपये किमतीची 'लँड रोव्हर डिफेंडर' ही आलिशान कार भेट दिली. घटस्फोटानंतरही हार्दिक आणि नताशा मिळून मुलाचा सांभाळ करत आहेत. हार्दिकच्या या कृतीचे सोशल मीडियावर मोठे कौतुक झाले. नताशा आणि अगस्त्य यांनी शोरूममध्ये ही कार स्वीकारतानाचा आनंद चाहत्यांच्या पसंतीस उतरला. ५ वर्षांचा अगस्त्य अनेकदा स्टेडियमवर आपल्या वडिलांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचत असतो, ज्यामुळे या बाप-लेकामधील घट्ट नाते वारंवार दिसून येते.

स्वतःसाठी १२ कोटींची 'फरारी'

आपल्या प्रियजनांना खुश केल्यानंतर, १५ मार्च रोजी हार्दिकने स्वतःच्या कार संग्रहात एका अत्यंत महागड्या आणि वेगवान कारची भर घातली. त्याने सुमारे १२ कोटी रुपये किमतीची 'फरारी १२ सिलिंद्री' (Ferrari 12Cilindri) खरेदी केली. या सुपरकारचा वेग ताशी ३४० ते ३५० किमी इतका प्रचंड आहे. हार्दिकने आपली मैत्रीण माहिका शर्मासोबत या नवीन कारमधून रपेट मारल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

मैत्रिणीला 'मर्सिडीज'ची भेट आणि कर्मचाऱ्यांची मदत

हार्दिकच्या दातृत्वाची चर्चा केवळ महागड्या भेटींपुरती मर्यादित नाही. २५ मार्च रोजी त्याने वानखेडे स्टेडियमवरील सुमारे १२ ग्राउंड स्टाफ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत केली. टी-२० विश्वचषकाच्या तयारीदरम्यान या कर्मचाऱ्यांना उशिरापर्यंत थांबावे लागल्याने, हार्दिकने त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ देण्याचे वचन दिले होते, जे त्याने पूर्ण केले. यानंतर, २९ मार्च रोजी हार्दिकने माहिका शर्माला १.७ कोटी रुपये किमतीची 'मर्सिडीज बेंज व्ही-क्लास' ही लक्झरी एमपीव्ही कार भेट म्हणून दिली. ही गाडी श्रीमंतांची पहिली पसंती मानली जाते.

लक्झरी कारचा ताफा

गाड्यांबद्दलचे हार्दिकचे प्रेम जुनेच आहे. त्याच्या ताफ्यात आधीपासूनच रोल्स-रॉयस फँटम, लॅम्बोर्गिनी हुराकॅन ईव्हीओ, लॅम्बोर्गिनी उरुस, मर्सिडीज-एएमजी जी६३ आणि रेंज रोव्हर वोग यांसारख्या जगातील सर्वोत्तम गाड्यांचा समावेश आहे. आयपीएल २०२६ मधील व्यस्त वेळापत्रकातही हार्दिक आपल्या वैयक्तिक आयुष्यातील या खास क्षणांमुळे चाहत्यांमध्ये सतत चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news