Virat Kohli Controversy: विराटला बदनाम करण्यासाठी मला पैशांची ऑफर दिली; जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा

Virat Kohli Controversy: जर्मन मॉडेल लिजलाजने विराट कोहलीविरोधात बोलण्यासाठी तिला पैशांची ऑफर मिळाल्याचा दावा केला आहे. विराटने तिची इंस्टाग्राम रील लाईक केल्यानंतर ही घटना घडल्याचं तिने सांगितलं.
Lizlaz on Virat Kohli
Lizlaz on Virat KohliPudhari
Published on
Updated on

Virat Kohli German Model Money Offer Controversy: भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली बाबत जर्मन मॉडेल लिजलाजने मोठा खुलासा केला आहे. विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी काही माध्यमांकडून मला पैसे ऑफर करण्यात आले होते, असा दावा तिने एका मुलाखतीत केला आहे. मात्र, आपण तो प्रस्ताव स्पष्टपणे नाकारल्याचंही तिने सांगितलं.

लिजलाजने ‘फिल्मीमंत्रा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, यावर्षीच्या सुरुवातीला विराट कोहलीने तिच्या इन्स्टाग्राम रीलला लाईक केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर या गोष्टीची मोठी चर्चा रंगली. विराट कोहली हा जगातील सर्वाधिक फॉलो केला जाणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये अग्रस्थानी असून इन्स्टाग्रामवर त्याचे 273 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्याच्या प्रत्येक सोशल मीडिया हालचालीवर चाहत्यांचं बारकाईने लक्ष असतं.

लिजलाजने सांगितलं की, “त्या घटनेनंतर भारतातील अनेक मीडिया आउटलेट्सनी माझ्याशी संपर्क साधला. विराट कोहलीविरोधात बोलण्यासाठी आणि त्याची नकारात्मक प्रतिमा तयार करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली. पण मी ती ऑफर नाकारली, कारण विराट माझा आवडता क्रिकेटर आहे. मी कधीच त्याच्याविरोधात बोलू शकत नाही.”

Lizlaz on Virat Kohli
Maamla Legal Hai Actress: वकिली सोडून मुंबईत आली! 'तू अभिनेत्री दिसत नाहीस...; म्हणत मिळाला नकार; पण हार न मानता गाठलं यश

तिने पुढे सांगितलं की, विराटने तिची रील लाईक केल्यावर ती भावूक झाली होती. “मला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. इतक्या मोठ्या क्रिकेट स्टारने माझी पोस्ट पाहिली, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती,” असं तिने म्हटलं.

Lizlaz on Virat Kohli
Rinku Rajguru-Akash Thosar new look|‘सैराट’ची जोडी आजही तितकीच याड लावणारी! आर्ची-परश्याची पुन्हा झिंगाट केमिस्ट्री चर्चेत

लिजलाजने विराट कोहलीचं कौतुक करताना त्याची तुलना फुटबॉल सुपरस्टार्स लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्याशी केली. “विराट कोहली हा आशियाचा मेस्सी आणि रोनाल्डो आहे. त्याची लोकप्रियता, चाहतावर्ग आणि प्रभाव प्रचंड मोठा आहे. भारतात विराटशी संबंधित अगदी छोटी गोष्टही मोठी बातमी बनते,” असं ती म्हणाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news