EURO 2024 : जॉर्जियाने पोर्तुगालला लोळवले, रोनाल्डोच्या संघावर सनसनाटी विजय

जॉर्जियन संघाची राऊंड ऑफ 16 फेरीत धडक
EURO 2024 Georgia vs Portugal
जर्मनी येथे सुरू असलेल्या युरो 2024 स्पर्धेत जॉर्जियाने रोनाल्डोचा संघ पोर्तुगालचा 2-1 गोलफरकाने पराभव केला.Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : EURO 2024 : जॉर्जियाने बुधवारी (दि. 27) युरो चषक स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर केला. या नवख्या संघाने दिग्गज रोनाल्डोचा संघ पोर्तुगालचा 2-0 अशा गोल फरकाने पराभव करत सर्वांनाच थक्क केले. या विजयसाह जॉर्जियन संघाने राऊंड 16 फेरीत प्रवेश केला. दरम्यान, या गटातून पोर्तुगाल आणि तुर्कीचे संघही बाद फेरीत पोहचण्यात यशस्वी झाले आहेत.

  • बाद फेरी गाठण्यासाठी जॉर्जियाला कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकावा लागणार होता.

  • जॉर्जेस एमच्या पासवर कावरात्सखेलियाने चेंडू गोलजाळ्यात पाठवला.

  • दुसरा गोल जॉर्जेस मिकौतात्झे याने 57व्या मिनिटाला केला.

जॉर्जियाची दुसऱ्याच मिनिटाला पोर्तुगालवर आघाडी

जॉर्जियाने खेळाच्या दुसऱ्याच मिनिटाला पोर्तुगाल संघाला पाणी पाजले. त्यांचा आक्रमक स्ट्रायकर खाविचा क्वारत्सखेलियाने गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धापर्यंत ही आघाडी कायम ठेवण्यात जॉर्जियाला यश आले. दुस-या हाफला सुरुवात झाल्यानंतर 57व्या मिनिटाला जॉर्जियाला पेनल्टी मिळाली. ज्यावर जॉर्ज मिकौताडझेने गोल करून संघाची आघाडी दुप्पट केली. रोनाल्डोचा संघ गोल करण्यासाठी धडपडत होता पण त्यांना जॉर्जियाच्या गोलजाळे भेदता आले नाही. त्यामुळे 2-0 च्या गोलफरकाने त्यांना पराभव पत्करावा लागला.

पोर्तुगाल एफ गटात अव्वल

पराभूत होऊनही पोर्तुगाल सहा गुणांसह एफ गटात अव्वल राहिला आहे. तुर्कस्तानचेही सहाच गुण झाले आहेत. पण त्यांना पण पोर्तुगालच्या तुलनेतील गोलफरकामुळे त्यांना दुस-या स्थानी समाधान मानावे लागले आहे. सरप्राईज पॅकेज जॉर्जिया तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे तीन सामन्यातून चार गुण झाले आहेत. ते तिसऱ्या क्रमांकाचा संघ म्हणून राऊंड 16 फेरीत मध्ये पोहोचले आहेत.

रोनाल्डोची जादू फिकी?

सध्याची युरो 2024 ही स्पर्धा 39 वर्षीय रोनाल्डोची पोर्तुगालसोबतची 10वी मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. यापूर्वीच्या 9 स्पर्धांच्या गट टप्प्यात त्याने किमान एक तरी गोल नोंदवला आहे. पण यंदाच्या युरो स्पर्धेतील गट टप्प्यातील सामन्यांत त्याची जादू दिसली नाही. त्याला एकही गोल करता आला नाही. तो केवळ तुर्की विरुद्धच्या सामन्यात ब्रुनो फर्नांडिसने डागलेल्या गोलमध्ये असिस्ट म्हणून भूमिका पार पाडण्यात यशस्वी ठरला होता. त्याला गेल्या 10 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मैदानी गोल करता आलेला नाही.

रोनाल्डो : युरो स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू

रोनाल्डो युरो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 14 गोल केले आहेत. ज्यात 2004 च्या आवृत्तीत दोन, 2008 मध्ये एक, 2012 मध्ये तीन, 2016 मध्ये तीन आणि 2020 मध्ये पाच गोल आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news