FIFA World Cup 2026 | तिसरा कौन?.. फ्रान्स की इंग्लंड

एम्बापे, डेशॅम्प्ससाठी इतिहास रचण्याची आज संधी
FIFA World Cup 2026 |
FIFA World Cup 2026 | तिसरा कौन?.. फ्रान्स की इंग्लंड
Published on
Updated on

मियामी : फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर आता फ्रान्स आणि इंग्लंड हे दोन बलाढ्य संघ शनिवारी, १८ जुलै रोजी तिसऱ्या स्थानासाठी (कांस्यपदक) एकमेकांसमोर ठाकणार आहेत.

तसे पाहाता अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगल्यामुळे दोन्ही संघांतील खेळाडूंसाठी हा सामना खेळणे मानसिकदृष्ट्या कठीण असले, तरी फ्रान्सचे मुख्य प्रशिक्षक डिडिएर डेशॅम्प्स यांचा हा शेवटचा सामना आणि स्टार खेळाडू किलियन एम्बापेचे ऐतिहासिक रेकॉर्ड यामुळे या सामन्याला एक वेगळीच धार आली आहे. फ्रान्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून डिडिएर डेशॅम्प्स यांच्या १४ वर्षांच्या सुवर्णकाळाचा या सामन्याने शेवट होणार आहे. ५७ वर्षीय डेशॅम्प्स यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रान्सने २०१८ चे विश्वविजेतेपद आणि २०२२ मध्ये उपविजेतेपद मिळवले होते.

२७ वर्षीय फ्रेंच कर्णधार किलियन एम्बापेसाठी हा सामना वैयक्तिक इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. या विश्वचषकात त्याने आतापर्यंत ८ गोल केले आहेत, तर विश्वचषकाच्या इतिहासातील त्याचे एकूण २० गोल झाले आहेत. ‘गोल्डन बूट’ मिळवण्याच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासोबतच, विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंचा सार्वकालिक विक्रम मोडण्याची एम्बापेला संधी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news