FIFA World Cup 2022 : वर्ल्डकपनंतर स्टेडियम होणार गायब

FIFA World Cup 2022 : वर्ल्डकपनंतर स्टेडियम होणार गायब
Published on
Updated on

दोहा, वृत्तसंस्था : फिफा विश्वचषकासाठी (FIFA World Cup 2022) कतारने अरबो रुपये खर्च केले आहेत. यापैकी स्टेडियम बांधणी आणि पंचतारांकित हॉटेल्स उभारणीवर सर्वात जास्त खर्च झाला आहे. छोटा देश असलेल्या कतारने आपल्या कुवतीबाहेरचा खर्च केला असला तरी या निमित्ताने आपला देश पर्यटनाच्याद़ृष्टीने जगाच्या नकाशावर येईल त्यासाठी या विश्वचषकासाठी त्यांनी मोठी बोली लावून यजमानपद मिळवले होते. त्यांनी ही स्पर्धा जवळपास यशस्वी करून दाखवली आहे. कतारने या स्पर्धेसाठी नवीन अत्याधुनिक 7 स्टेडियम उभारली असली तरी स्पर्धेनंतर या स्टेडियमचे मेंटनन्स राखणे मोठ्या खर्चाचे काम आहे. म्हणून कतारने यापैकी एक स्टेडियम असे उभारले आहे की, स्पर्धेनंतर ते नष्ट करता येऊ शकणार आहे.

बांधलेल्या सात स्टेडियमपैकी एक संपूर्ण स्टेडियम हे स्पर्धेनंतर गायब होणार आहे. आयोजकांनी दोहा येथील स्टेडियम 974 बद्दल सांगितलेल्या माहितीनुसार 40,000 पेक्षा जास्त आसन क्षमता असणारे हे स्टेडियम शिपिंग कंटेनर्स वापरून साकारण्यात आले आहे. फिफा विश्वचषकाच्या नंतर हे स्टेडियम पूर्णपणे तोडून यातील कंटेनर्स व अन्य साहित्य हे गरज व मागणीनुसार अन्य देशांना पाठवण्यात येणार आहे.

स्टेडियम 974 आणि इतर दोन विश्वचषक स्टेडियमचे डिझाईन करणार्‍या फेनविक इरिबरेन यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिका, रशिया व ब्राझीलमधील विश्वचषक स्पर्धेनंतरचे उदाहरण पाहता नवे स्टेडियम उभारून 'पांढरा हत्ती' पोसावा लागू नये असा मुख्य हेतू होता. स्पर्धा संपल्यानंतर ही जागा पुन्हा वापरासाठी मोकळी होऊ शकेल. तसेच फिफा विश्वचषक संपल्यावर सुद्धा इतर सहा स्टेडियममधील आसन क्षमता रिक्त करून जागा मोकळी करण्यात येणार आहे. (FIFA World Cup 2022)

स्टेडियम 974 च्या बांधकामात रंगीबेरंगी शिपिंग कंटेनर वापरलेले आहेत. संरचनेच्या आतील भागात स्वच्छतागृहांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. लाल, पिवळे आणि निळे बॉक्स विविध थरांमध्ये रचलेले आहेत. या डिझाईनमुळे स्टेडियमला एक औद्योगिक स्वरूप मिळते. याच स्टेडियममध्ये स्वित्झर्लंडने सर्बियाचा पराभव केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news