स्पेनच 'युरो'चा 'सम्राट'; इंग्लंडचा २-१ ने पराभव

स्पेनने चौथ्यांदा युरो कप जिंकला, इंग्लंडचे स्वप्न पुन्हा भंगले
EURO Cup Final
स्पेनच युरो कपचा 'सम्राट'; इंग्लंडचा २-१ ने पराभव file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : युरो कप २०२४ च्या अंतिम सामन्यात स्पेनने इंग्लंडचा २-१ असा पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. जर्मनीतील बर्लिनमध्ये रविवारी (दि. १५) झालेल्या रोमांचक सामन्यात मिकेल ओयारझाबालने ८७ व्या मिनिटाला ऐतिहासिक गोल करून स्पेनला विजय मिळवून दिला. स्पेनने विक्रमी चौथ्यांदा युरो कप जिंकला आहे. यापूर्वी १९६४, २००८ आणि २०१२ मध्ये युरोपियन चॅम्पियनशिप जिंकली होती.

बर्लिनच्या ऑलिम्पियास्टॅडियन येथे खेळल्या गेलेल्या युरो कप फायनलच्या अंतिम सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांकडून एकही गोल झाला नाही. मात्र, या काळात स्पॅनिश संघाचा सामन्यावर ताबा होता. दुसरीकडे, पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत इंग्लंडच्या फिल फोडेनने गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्पेनचा गोलरक्षक यु. सायमनने शानदार बचाव केला. दुसऱ्या हाफमध्ये सामन्याच्या ४७ व्या मिनिटाला निकोलस विल्यम्सने लमिन यामलच्या उत्कृष्ट क्रॉसवर गोल करत स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. खेळाच्या ७३ व्या मिनिटाला कोल पामरने ज्युड बेलिंगहॅमच्या क्रॉसवर गोल करून इंग्लंडला बरोबरी साधून दिली. खेळाच्या ८६ व्या मिनिटाला स्पेनच्या मिकेल ओयारझाबाल याने गोल केला, जो सामन्यातील निर्णायक गोल ठरला.

EURO Cup Final
Anshuman Gaikwad Cancer| अंशुमन गायकवाड यांना 'बीसीसीआय'कडून मदत जाहीर

इंग्लंडचे स्वप्न पुन्हा भंगले

सेमीफायनल सामन्यात इंग्लंडने नेदरलँड्सचा २-१ ने पराभव केला होता. दुसरीकडे स्पेननेही फ्रान्सचा २-१ असा पराभव करत विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला. युरो २०२४ चे आयोजन जर्मनीने केले होते. जर्मनीला उपांत्यपूर्व फेरीत स्पेनकडून पराभव स्वीकारावा लागला होता. स्पेन हा युरो कपमधील सर्वात यशस्वी संघ आहे. तर जर्मनी तीन विजेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता. याआधी २०१० च्या स्पर्धेत इटलीकडून विजेतेपदाच्या सामन्यात पराभव झाला होता. या स्पर्धेच्या ६६ वर्षांच्या इतिहासात इंग्लंडला एकदाही चॅम्पियन बनता आलेले नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news