Euro 2024 : राउंड-16 चे वेळापत्रक जाहीर! ‘हे’ संघ एकमेकांना भिडणार

पोर्तुगालला मात देऊन जॉर्जिया राउंड-16 साठी पात्र
Euro 2024 Round of 16
युरो चषक 2024 स्पर्धेचा गट टप्पा पूर्ण झाला आहे. Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : Euro 2024 : युरो चषक 2024 स्पर्धेचा गट टप्पा पूर्ण झाला आहे. आता राऊंड ऑफ 16 फेरीची सुरुवात होणार आहे. ही बाद फेरी असणार आहे. यासाठी स्पेन, जर्मनी, इंग्लंड, इटली, पोर्तुगाल, फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड्स, डेन्मार्क, स्लोव्हेनिया, रोमानिया, ऑस्ट्रिया, तुर्की, स्लोव्हाकिया, स्वित्झर्लंड आणि जॉर्जिया हे संघ पात्र ठरले आहेत.

युक्रेन विरुद्ध गोलशून्य बरोबरी साधून बेल्जियमने अंतिम 16 संघांमध्ये प्रवेश केला. तर युक्रेन हा चार गुणांसह स्पर्धेतून बाहेर पडला. रोमानिया विरुद्ध स्लोव्हाकिया सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ज्या निकालानंतर दोन्ही संघांनी बाद फेरीत प्रवेश केला. या ई गटात सर्व संघांचे चार गुण झाले. पण उत्तम गोल सरासरीच्या आधारे रोमानियाने बेल्जियमला ​​मागे टाकत ई गटात अव्वल स्थान पटकावले. बेल्जियम दुसऱ्या आणि स्लोव्हाकिया तिसऱ्या स्थानावर राहिले. जॉर्जियाने पोर्तुगालला 2-0 ने पराभूत करून शानदार कामगिरी केली. हा संघ राऊंड 16 फेरीसाठी पात्र ठरला आहे. बाद फेरीत त्यांचा सामना स्पेनशी होणार आहे.

29 जून रोजी राऊंड-16 चा पहिला सामना

राऊंड 16 फेरीचे सामने 29 जूनपासून खेळवले जाणार आहेत. प्रत्येक दिवशी दोन सामने असतील. पहिला सामना स्वित्झर्लंड आणि इटली यांच्यात भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता खेळवला जाईल. या फेरीचा शेवटचा सामना 3 जुलै रोजी ऑस्ट्रिया विरुद्ध तुर्की यांच्यात होणार आहे.

युरो 2024 च्या फेरी-16 सामन्यांचे वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार)

29 जून

  • स्वित्झर्लंड विरुद्ध इटली : रात्री 9:30 वाजता

30 जून

  • इंग्लंड विरुद्ध स्लोव्हाकिया : 9:30 वाजता

  • जर्मनी विरुद्ध डेन्मार्क : रात्री 12:30 वाजता

1 जुलै

  • फ्रान्स वि बेल्जियम : रात्री 9:30 वाजता

  • स्पेन विरुद्ध जॉर्जिया : रात्री 12:30 वाजता

2 जुलै

  • रोमानिया विरुद्ध नेदरलँड्स : रात्री 9:30 वाजता

  • पोर्तुगाल विरुद्ध स्लोव्हेनिया : रात्री 12:30 वाजता

3 जुलै

  • ऑस्ट्रिया विरुद्ध तुर्की : रात्री 12:30

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news