

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) भारताविरुद्धच्या अगामी एकदिवसीय आणि टी-20 मालिकेव्यतिरिक्त चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर केला आहे. जोस बटलरकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी ब्रॅडन मॅक्युलम सांभाळतील. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर जो रूट प्रथमच एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतला आहे. बेन स्टोक्सला वगळण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर केले नसले तरीही इंग्लंडने आपल्या संघाची घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
इंग्लंड 2025 च्या सुरुवातीला भारताविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. याची सुरुवात 22 जानेवारीला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्याने होईल. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल. या मालिकेतील पहिला सामना 6 फेब्रुवारी रोजी नागपुरात खेळला जाणार आहे.
जोफ्रा आर्चर आणि गस ऍटकिन्सन यांना वनडे आणि टी-20 या दोन्ही संघांमध्ये स्थान देण्यात आले आहे. हॅरी ब्रूक आणि बेन डकेट यांच्यावरही संघाने विश्वास व्यक्त केला आहे.
2023 च्या वनडे वर्ल्डकपनंतर जो रूटचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. तर 2019 विश्वचषक विजेतेपदाचा नायक बेन स्टोक्सला वगळण्यात आले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान त्याला डाव्या हाताला दुखापत झाली होती. त्याचमुळे स्टोक्सचा विचार करण्यात आलेला नाही. इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून ब्रेंडन मॅक्युलमची ही मर्यादीत षटकांची पहिलीच मालिका आहे.
पहिला टी-20 सामना : 22 जानेवारी (कोलकाता)
दुसरा टी-20 सामना : 25 जानेवारी (चेन्नई)
तिसरा टी-20 सामना : 28 जानेवारी (राजकोट)
चौथा टी-20 सामना : 31 जानेवारी (पुणे)
पाचवा टी-20 सामना : 2 फेब्रुवारी (मुंबई)
पहिला वनडे सामना : 6 फेब्रुवारी (नागपूऱ)
दुसरा वनडे सामना : 9 फेब्रुवारी (कटक)
तिसरा वनडे सामना : 12 फेब्रुवारी (अहमदाबाद)
जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.