पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातल्या महान क्रिकेटमध्ये गणना होत असलेल्या आणि भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडलेल्या राहुल द्रविड यांच्या मुलाची भारताच्या अंडर 19 संघात निवड झाली आहे. राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड याची ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या एकदिवसीय आणि चार दिवसीय सामन्यांसाठी निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (दि. 31) रोजी अंडर-19 संघाची घोषणा केली.
एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा अंडर-19 संघ : रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंशसिंग पंगालिया (विकेटकीपर), समित द्रविड, युद्ध गुहा , समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राज अवत, मोहम्मद अनन.
चार दिवसीय मालिकेसाठी भारताचा अंडर-19 संघ : वैभव सूर्यवंशी, नित्या पंड्या, विहान मल्होत्रा (उपकर्णधार), सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंशसिंग पनगालिया (विकेटकीपर), चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग, मोहम्मद अनन.
21-सप्टेंबर 1ला एकदिवसीय, पुडुचेरी, सकाळी 9:30 वा
२३-सप्टेंबर-२४ दुसरी वनडे, पुद्दुचेरी, सकाळी ९:३०
26-सप्टे-24 3रा एकदिवसीय, पुडुचेरी, सकाळी 9:30 वा
30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर, पहिला चार दिवसीय सामना, चेन्नई, सकाळी 9.30 वा
07-ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर, दुसरा चार दिवसीय सामना, चेन्नई, सकाळी 9:30 वा.