Wimbledon 2024 : अल्काराझची सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनच्या फायनलमध्ये धडक, मेदवेदेवचा पराभव

28 वर्षीय मेदवेदेवचा 6-7, 6-3, 6-4, 6-4 असा पराभव
Carlos Alcaraz Wimbledon final
गतविजेता कार्लोस अल्काराझने सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारलीTwitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : Wimbledon 2024 : गतविजेता कार्लोस अल्काराझने सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. लंडनच्या सेंटर कोर्टवर शुक्रवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत त्याने 28 वर्षीय मेदवेदेवचा 6-7, 6-3, 6-4, 6-4 असा पराभव केला. हा सामना सुमारे 3 तास चालला.

जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानी असणा-या अल्काराझची सुरुवात खराब झाली. मेदवेदेवने पहिला सेट ट्रायब्रेकरवर 6-7(1) ने जिंकला. पिछाडीवर पडलेल्या अल्काराझने हार मानली नाही आणि पुढच्या सेटमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. हा सेट त्याने 6-3 ने खिशात टाकला. यानंतर अल्काराझने 6-4, 6-4 अशा फरकाने सलग दोन सेट आपल्या नावावर केले आणि सामन्यात विजय मिळवून सलग दुस-यांदा विम्बल्डन पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. रविवारी (14 जुलै) होणाऱ्या अंतिम फेरीत अल्काराझचा सामना नोव्हाक जोकोविच आणि लोरेन्झो मुसेट्टी यांच्यातील उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news