MS Dhoni Retirement : धोनीच्या निवृत्तीवर सीएसकेच्या CEOचं मोठं विधान, चाहत्यांना झटका

MS Dhoni Retirement : धोनीच्या निवृत्तीवर सीएसकेच्या CEOचं मोठं विधान, चाहत्यांना झटका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : MS Dhoni Retirement : चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. शनिवारी (दि. 18) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्यांचा 27 धावांनी पराभव झाला. ज्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. त्या सामन्यानंतर सीएसकेचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू एमएस धोनीच्या निवृत्तीची चर्चा जोरात सुरू झाली आहे. दरम्यान, या संघाच्या सीईओंनी त्यांच्या भविष्यातील योजनांचा खुलासा केला आहे. क्रिकबझशी बोलताना त्यांनी अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत.

काय म्हणाले CSKचे CEO?

चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीचे अधिकारी देखील धोनीच्या पुढील हंगामात खेळण्याबाबत अनिश्चित आहेत. फ्रँचायझीचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी रविवारी सांगितले की, ' धोनीने आम्हाला काहीही सांगितले नाही. तो अशा गोष्टी सांगत बसत नाही तर तो थेट निर्णय घेऊन मोकळा होतो.'

धोनीचे भवितव्य रिटेंशन पॉलिसीवर अवलंबून

त्यामुळे धोनी स्वत: त्याच्या निवृत्तीबाबत खुलासा करत नाही तोपर्यंत आयपीएलच्या पुढच्या हंगामात तो खेळणार की नाही याविषयीची निव्वळ चर्चाच होत राहणार आहेत. तथापि, धोनीला या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी पुढील हंगामापर्यंत वेळ मिळणार नाही. बीसीसीआय लवकरच रिटेंशनसाठी एक नवी पॉलिसी जारी करू शकते. अशा स्थितीत फ्रँचायझीला रिटेंशनची यादी जाहीर करण्यापूर्वी निर्णय घ्यावा लागेल. धोनीलाही या नव्या पॉलिसीला लक्षात घेऊनच पुढील निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र, हे धोरण प्रत्यक्षात येण्यास अजून काही कालावधी आहे. धोनीकडे नोव्हेंबरपर्यंत वेळ असू शकतो, असे मानले जात आहे. (MS Dhoni Retirement)

फिटनेसवर सर्वस्वी अवलंबून

धोनीने चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यानंतर निवृत्तीबाबत कोणतीही घोषणा केली नाही. सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे रविवारी, त्याने बंगळुरूहून रांचीला गाठले. पुढच्या वर्षी तो आयपीएलमध्ये खेळणार की नाही हा मोठा प्रश्न त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. (MS Dhoni Retirement)

'वेदनांशी झुंज देत खेळला'

मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगसह सीएसकेच्या अनेक सदस्यांनी सांगितले की, धोनी हा हंगाम दुखापती आणि वेदनांशी झुंज देत खेळला. असे असूनही, त्याने सर्व 14 सामने खेळले आणि वेगवेगळ्या स्थानांवर फलंदाजी करताना 53 पेक्षा जास्त सरासरीने 161 धावा केल्या.

धोनीची भूमिका बदलेल? (MS Dhoni Retirement)

सूत्रांच्या माहितीनुसार, चेन्नई सुपर किंग्सचे मालक श्रीनिवासन यांनी आपल्या फ्रँचायजीसाठी काही महत्त्वाच्या योजना आखल्या आहेत. ज्यात CSK ला मूळ मालकी असणा-या इंडिया सिमेंट्स या कंपनीपासून वेगळे करण्यासाठी एक पाऊल उचलले जाऊ शकते. अशा स्थितीत धोनीची भूमिका बदलू शकते. ज्यात तो मैदानात दिसणार नाही पण संघासाठी सल्लागार, मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहू शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news