Cristiano Ronaldo s bicycle kick goal for Al Nassr creates storm on social media

VIDEO : रोनाल्डोचा ‌‘बायसिकल किक‌’वर शानदार गोल, 40 व्या वर्षीही जलवा कायम

Ronaldo bicycle kick goal : रोनाल्डोच्या प्रगल्भ खेळाची आणखी एकदा उत्तम प्रचिती
Published on

Ronaldo’s bicycle kick goal for Al Nassr creates storm on social media

रियाध : पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी अरेबियातील क्लब अल नासरकडून ‌‘बायसिकल किक‌’ने गोल करत आपल्या प्रगल्भ खेळाची आणखी एकदा उत्तम प्रचिती दिली.

पोर्तुगालच्या या 40 वर्षीय दिग्गज खेळाडूने उजव्या बाजूने आलेल्या क्रॉसला ॲक्रोबॅटिक व्हॉलीने (बायसिकल किकने) गोलजाळीत वळवले. हा फटका इतका जोरदार होता की प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला तो अडवणेच शक्य नव्हते. रोनाल्डोच्या या गोलमुळे अल नासरने सौदी प्रो-लीगमध्ये अल खलीजवर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला.

रोनाल्डो नुकताच पोर्तुगालसाठी आंतरराष्ट्रीय कर्तव्यावरून क्लब संघात परतला आहे. या दरम्यान, आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याला मैदानाबाहेर पाठवण्यात आले होते. मात्र, त्याच्या गैरहजेरीतही पोर्तुगालने दमदार विजय मिळवत विश्वचषकासाठी पात्रता मिळवली.

आगामी विश्वचषकात खेळल्यास तो विक्रमी सहाव्यांदा हा सन्मान मिळवेल. शिवाय, सातत्याने हुलकावणी देत असलेल्या या जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याचा शेवटचा जोरकस प्रयत्नही करेल.

या सामन्यात अल नासरकडून रोनाल्डो व्यतिरिक्त जे फेलिक्स (39 वे मिनीट), वेस्ले (42 वे मिनीट) आणि सॅडिओ (77 वे मिनीट) यांनी गोल करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. अल खलीजकडून अल हवासवीने (47 वे मिनीट) एकमेव गोल केला. मात्र, शेवटच्या क्षणी रोनाल्डोने केलेला हा 'चमत्कारिक' गोल संपूर्ण सामन्यावर भारी पडला आणि त्याने आपला CR7 चा जलवा कायम असल्याचे दाखवून दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news