

पुढारी ऑनलाईन डेस्क :
रॉबिन उथ्थपा २७ चेंडूत ५०, शिवम दुबे ३० चेंडूत ४९ आणि अंबती रायडूच्या २० चेंडूत २७ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांअखेर २१० धावांपर्यत मजल मारली. चेन्नईने लखनौ समोर २११ धावांचे आव्हान आहे. लखनौ सुपर जायंट्स कडून रवी बिश्नोई, अँड्र्यू टाय आणि आवेश खान यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.
रविंद्र जडेजा ६ चेंडूमध्ये १४ धावा करत तंबूत परतला.
शिवम दुबे ३० चेंडूमध्ये ४९ धावांची खेळी करत तंबूत परतला.
अंबती रायडू २० चेंडूंंमध्ये २७ धावांची खेळी करत तंबूत परतला.
शिवम दुबे आणि अंबती रायडूने चौथ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली आहे. शिवम दुबे २४ चेंडूमध्ये ३७ धावांचे तर अंबती रायडूने १८ चेंडूमध्ये २८ धावांचे योगदान दिले.
मोईन अली २२ चेंडूंमध्ये ३५ धावांची खेळी करत तंबूत परतला.
रॉबिन उथ्थपा २७ चेंडूमध्ये ५० धावांची खेळी करत तंबूत परतला आहे.
रॉबिन उथ्थपाच्या अर्धशतकीच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज स्कोर ७ .१ षटकांअखेर ८४ इतका आहे. रॉबिन उथ्थपाने २५ चेंडूमध्ये ५० धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या विकेटसाठी मोईन अली आणि रॉबिन उथ्थपाने ५६ धावांची भागिदारी केली आहे. रॉबिन उथ्थपाने ८ चौकार आणि १ षटकार मारत अर्धशतक झळकावले.
ऋतुराज गायकवाड ४ चेंडूमध्ये १ धाव करत धावबाद झाला.
लखनौ सुपर जायंट्सने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आज लखनौ सुपर जायंट्स वि. चेन्नई सुपर किंग्स हा सामना ब्रेबॉर्न स्टेडीयमवर खेळवला जात आहे. (CSKvsLSG)
चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघाना पहिल्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला होता. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार के.एल.राहुलने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. (CSKvsLSG)