.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १०० ग्रॅम वजन वाढल्याने अगदी शेवटच्या क्षणी अपात्रतेचा सामना करावा लागला. यामुळे तिचे पदकाचे स्वप्न भंगले. त्यानंतर तिने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) मध्ये अर्ज केला. यावरील सुनावणी पार पडली असून, या संदर्भातील निकाल पुन्हा एकदा राखून ठेवण्यात आला आहे. विनेश फोगाट हिच्या अर्जावर आता मंगळवार, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता निर्णय देण्यात येणार आहे अशी माहिती भारतीय ऑलिंपिक संघाने दिल्याचे वृत्त 'PTI'ने दिले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वजन वाढल्यामुळे विनेश फोगटला संपूर्ण स्पर्धेतूनच अपात्र ठरविण्यात आले. यानंतर दुसऱ्याच दिवशी आज विनेश फोगटने निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, विनेशने बुधवारी 50 किलो गटाच्या ऑलिम्पिक फायनलमधून तिला अपात्र ठरवल्याच्या कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (सीएएस)कडे अपील केले हाेते. तिने या स्पर्धेत संयुक्त रौप्यपदक देण्याची मागणी केली होती.
उपांत्य फेरीत विनेशकडून पराभूत झालेल्या क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन लोपेझने अंतिम फेरीत स्थान मिळाले. अमेरिकन सारा ॲन हिल्डेब्रँडने हा सामना जिंकून सुवर्णपदक जिंकले. तर उपांत्य आणि अंतिम फेरीत पराभव हाेवूनही क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन लोपेझने हिला राैप्य पदकमिळाले हाेते
ऑलिम्पिक खेळांदरम्यान किंवा उद्घाटन समारंभाच्या 10 दिवसांच्या कालावधीत उद्भवलेल्या कोणत्याही विवादाच्या मध्यस्थीद्वारे निराकरण करण्याचे काम कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (सीएएस) ही आंतरराष्ट्रीय संस्था पाहते. १९८४ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील लॉसने येथे आहे. CAS चे काम क्रीडा विवाद, विशेषत: शिस्तभंग प्रकरणे आणि डोपिंग प्रकरणांमध्ये निष्पक्ष आणि तटस्थ निर्णय देणे असे आहे. त्याचे निर्णय अनिवार्य आहेत आणि ती क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च न्यायालयीन संस्था मानली जाते.
विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरली होती. सुवर्णपदकाच्या लढतीच्या दिवशी सकाळी तिचे वजन ५०.१ किलो होते. पात्रतेच्या निकषांपेक्षा तिचे वजन १०० ग्रॅम होते. फोगटची अपात्रता ही प्रत्येक भारतीयासाठी एक मोठा धक्का होता. सुवर्णपदकाच्या एका रात्री अगोदर विनेशने उपांत्य फेरीनंतर मिळवलेले 2.7 किलो वजन कमी करण्यासाठी सराव केला. भारताचे मुख्य वैद्यकीय अधिकारी दिनशॉ पार्डीवाला यांनी स्पष्ट केले की,. पॅरिसच्या उष्णतेमध्ये सौनामध्ये वेळ घालवण्यासाठी विनेशने वजन कमी करण्यासाठी अथक परिश्रम केले होते. जेव्हा सर्व काही अयशस्वी झाले, तेव्हा प्रशिक्षकांनी तिचे केस कापण्याचा प्रयत्न केला; परंतु तरीही वजन 50 किलोग्रॅमपर्यंत पोहोचू शकले नाही. यामुळे अखेर तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले.