Brij Bhushan Sharan Singh Acquits: बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा... महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणाच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता

Brij Bhushan Sharan Singh
भारतीय जनता पक्षाचे नेते ब्रिजभूषण शरण सिंह.Pudhari
Published on
Updated on

Brij Bhushan Sharan Singh Acquits: महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात एक मोठी अपडेट आली असून दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने भाजपचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Sharan Singh | "खरं बोललो तर मीच अडचणीत येईन..." : राम मंदिर कथित देणग्यांच्या वादावर बृजभूषण नेमकं काय म्हणाले?

दिल्ली कोर्टाचा निकाल आल्यावर माजी खासदार ब्रिज भूषण शरण सिंह यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्यांनी मी योग्य होतो हे सिद्ध झालं आहे असं सांगितलं. ते म्हणाले की, 'माझे वक्तव्य खरं ठरलं आहे. मला विरोध करण्याऱ्या व्यक्तींबाबत काही माहिती नाही.. मी म्हणालो होतो की जर मी दोषी असेन तर मला फासावर लटकवा. बाकी आज आनंदाचा दिवस आहे.'

Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Singh : दहा कोटींची संपत्ती.. दबंग कारकीर्द… सहा वेळा खासदार!

साडेतीन वर्षे चालली कायदेशीर प्रक्रिया

भारतीय कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप प्रकरण जवळपास साडे तीन वर्षे चालले. त्यानंतर ३ ऑगस्ट २०२६ मध्ये न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. या प्रकरणाची सुरूवात जानेवारी २०२३ मध्ये सुरू झाली होती.

Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Sharan Singh : ‘साजिश के पीछे कौन; राजीनामा देण्याचा प्रश्नचं येत नाही’ : बृजभूषण शरण सिंह

१८ जानेवारी रोजी जंतर मंतरवर भारताच्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केलं होतं. १९ जानेवारी रोजी बबीता फोगाटने आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची भेट घेऊन सरकारशी चर्चा करण्याचे आश्वासन दिलं होतं. त्याच दिवशी माजी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील बेट घेतली होती. २० जानेवारी रोजी विनेश फोगाटने भारतीय ऑलिंम्पिक संघ, पंतप्रधान कार्यालय आणि अनुराग ठाकूर यांच्यासह अमित शहा यांच्याकडे ट्विट करून तक्रार केली होती. २१ जानेवारी रोजी अनुराग ठाकूर यांच्याशी चर्चेनंतर कुस्तीपटूंनी आपले आंदोलन मागे घेतले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news