नवी दिल्ली : दिल्लीचा स्पीडस्टार हर्षित राणा व आंध्रचा मध्यमगती गोलंदाज नितीश रेड्डीची ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्या 5 कसोटी सामन्यांच्या बोर्डर-गावसकर चषक मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघात निवड झाली आहे. शमीचा या संघात समावेश नाही, तर कुलदीप यादवला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी कर्नाटकचा सीमर विजयकुमार व पंजाबचा फलंदाज रमणदीप सिंग यांना संधी देण्यात आली आहे.
बोर्डर-गावसकर चषकासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर. अश्विन, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार, वॉशिंग्टन सुंदर. राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार, आवेश खान, यश दयाल.