बीसीसीआयला मिळणार पैसाच पैसा!

बीसीसीआयला मिळणार पैसाच पैसा!
Published on
Updated on

मुंबई, वृत्तसंस्था : टीम इंडिया आशिया कप 2023 नंतर वर्ल्डकप 2023 मध्ये भाग घेणार आहे. यानंतर 2028 पर्यंत संघ वेगवगळ्या मालिकेत खूप व्यस्त असेल. टीम इंडियामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला खूप फायदा होणार आहे. पाच वर्षांच्या नव्या चक्रात टीम इंडिया घरच्या मैदानावर म्हणजेच मायदेशात जवळपास 88 सामने खेळणार आहे. टीव्ही आणि डिजिटल अधिकारांमुळे बीसीसीआय सुमारे एक अब्ज डॉलर्स कमावू शकते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुढील 5 वर्षांत भारतात होणार्‍या सामन्यांचे मीडिया अधिकार संपादन करण्यासाठी निविदा जाहीर केली आहे. बीसीसीआयला यापेक्षा मोठी रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. मीडिया अधिकारांच्या लिलावाची रक्कम एक अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत जाऊ शकते जी सुमारे 8200 कोटी रुपये आहे. 2028 पर्यंत 88 देशांतर्गत सामन्यांसाठी या हक्कांचा लिलाव होणार आहे.

नवीन नियोजनामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 21 घरगुती सामने (5 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 10 टी-20) आणि इंग्लंडविरुद्ध 18 सामने (10 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20) आहेत. भारताला एकूण 25 कसोटी, 27 एकदिवसीय आणि 36 टी-20 सामने खेळायचे आहेत.

गेल्या पाच वर्षांच्या काळात (2018 ते 2023), बीसीसीआयला स्टार इंडियाकडून 944 दशलक्ष (सुमारे 6138 कोटी रुपये) मिळाले आहेत, ज्यात प्रतिसामना (डिजिटल आणि टीव्ही) 60 कोटी रुपये समाविष्ट आहेत. यावेळी बीसीसीआय डिजिटल आणि टीव्ही हक्कांसाठी स्वतंत्र बोली मागवणार आहे.

बीसीसीआयकडून ई-लिलाव आयोजित केला जाईल. याआधी 2018 मध्ये मीडिया हक्कांचा लिलाव झाला होता, त्यावेळी तो ऑफलाइन आयोजित करण्यात आला होता. यावेळी टीव्ही आणि डिजिटलसाठी स्वतंत्र हक्क दिले जाणार आहेत. तर यापूर्वी दोघांचे हक्क स्टारकडे होते. आयपीएल मीडिया अधिकारांमधून 48,390 कोटी रुपये कमावले होते. भारताच्या देशांतर्गत सामन्यांसाठी डिस्ने-स्टार, रिलायन्स-व्हायकॉम हे प्रमुख दावेदार असतील.

वर्ल्डकपच्या निकालाचा जाहिरातींवर परिणाम?

तीन महिन्यांनी विश्वचषक होणार असून जर भारत जिंकू शकला नाही तर जाहिरातींच्या कमाईवर परिणाम होणार आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, एका प्रसारकाने सांगितले की, या चक्रामध्ये 25 देशांतर्गत कसोटी सामने होणार आहेत. आधीचे कसोटी सामन्यांचे निकाल पाहता पाचव्या दिवसापर्यंत किती कसोटी गेल्या आहेत हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे. माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक तीन दिवसांत संपले आहेत, त्यामुळे या एका पैलूवर विचार मंथन सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news