Rohit-Virat : रोहित-विराटला BCCI देणार मोठा झटका..! 'सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट'साठी आखली जातेय नवी योजना

बीसीसीआय आपल्या करार पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत
Rohit-Virat : रोहित-विराटला BCCI देणार मोठा झटका..! 'सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट'साठी आखली जातेय नवी योजना
Published on
Updated on

Big Setback for Rohit Sharma and Virat Kohli in BCCI Central Contracts

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आपल्या खेळाडूंच्या वार्षिक कराराच्या (Central Contract) संरचनेत आमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत आहे. या नवीन आराखड्यामुळे संघातील दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीसीसीआय आपल्या करार पद्धतीतून 'ए प्लस' (A+) ही सर्वोच्च श्रेणी रद्द करून केवळ ए, बी आणि सी अशा तीनच श्रेणी कायम ठेवण्याचा विचार करत आहे.

श्रेणी कपातीचा दिग्गज खेळाडूंना फटका

बीसीसीआयच्या या संभाव्य निर्णयामुळे केवळ विराट आणि रोहितच नव्हे, तर जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्या श्रेणीतही घट होऊ शकते. सध्या हे चारही खेळाडू 'ए प्लस' श्रेणीचा भाग आहेत. 'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, जर नवीन मॉडेल लागू झाले, तर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांची रवानगी थेट 'ग्रेड-बी' मध्ये केली जाऊ शकते, तर जसप्रीत बुमराहला 'ग्रेड-ए' मध्ये स्थान मिळू शकते.

निवड समितीचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या रचनेत बदल करण्याची सूचना केली आहे. समितीने ७ कोटी रुपये मानधन असलेली 'ए प्लस' श्रेणी रद्द करून केवळ तीन श्रेणी ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या बदलामुळे खेळाडूंच्या मानधनाच्या रचनेतही मोठे फेरबदल होतील.

सध्याचे मानधन स्वरूप

  • ग्रेड-ए प्लस : ७ कोटी रुपये

  • ग्रेड-ए : ५ कोटी रुपये

  • ग्रेड-बी : ३ कोटी रुपये

  • ग्रेड-सी : १ कोटी रुपये

नवीन मॉडेल अमलात आल्यास या मानधनाच्या आकड्यांमध्येही बीसीसीआय सुधारणा करण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षातील कराराची स्थिती

एप्रिल २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या करारानुसार, रोहित, विराट, जडेजा आणि बुमराह हे 'ए प्लस' श्रेणीत होते. तर मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांचा समावेश 'ग्रेड-ए' मध्ये करण्यात आला होता. सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि कुलदीप यादव यांसारखे खेळाडू 'ग्रेड-बी' मध्ये होते, तर रिंकू सिंह, शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांच्यासह अनेक तरुण खेळाडूंना 'ग्रेड-सी' मध्ये स्थान मिळाले होते.

निवड समितीच्या या प्रस्तावावर बीसीसीआय अंतिम मोहोर कधी उमटवते, याकडे आता क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news