#ArrestKohli : ‘विराट कोहलीला अटक...’, बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर सोशल मीडियात ‘अरेस्ट कोहली’ ट्रेंड

#ArrestKohli हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक ट्रेंडिंग विषय बनला आहे. बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणा अनेक नेटक-यांनी कोहलीवर सडकून टीका केली आहे.
bengaluru stampede #arrestkohli trends on social media users slam kohli
Published on
Updated on

bengaluru stampede #arrestkohli trends on social media users slam kohli

रॉयल चैलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)ने आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला 6 धावांनी पराभव करून 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले. हा विजय साजरा करण्यासाठी बेंगलुरूच्या रस्त्यांवर लाखो चाहते उतरले, पण हा उत्साह क्षणार्धात शोकांतिकेत बदलला. विधान सौधपासून एम. चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंतच्या विजयी मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 67 जण जखमी झाले. दरम्यान, या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले असतानाच सोशल मीडियावर #ArrestKohli हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे, ज्यामुळे विराट कोहली आणि आरसीबीवर टीकेची झोड उठली आहे.

काय घडले?

बुधवारी (4 जून) आरसीबीच्या खेळाडूंना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधान सौध येथे सत्कार केला. त्यानंतर, खुल्या बसमधून आरसीबी खेळाडूंच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी लाखो चाहते आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी रस्त्यांवर जमले. पण, अपु-या नियोजनामुळे आणि प्रचंड गर्दीमुळे स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अनेक चाहते स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी भिंत आणि मैदानाच्या गेटवर चढत होते, ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, ज्यात तरुण मुले, महिला आणि मुलांचा समावेश होता.

bengaluru stampede #arrestkohli trends on social media users slam kohli
Team India Spinner Retirement : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय स्पिनरची निवृत्ती!

कर्नाटक सरकारने मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये नुकसानभरपाई आणि जखमींसाठी मोफत उपचाराची घोषणा केली आहे. बेंगळुरू पोलिसांनी आरसीबी, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याविरुद्ध भादंवि अंतर्गत खुनाशी संबंधित नसलेल्या हत्येच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला आहे. आरसीबीचे मार्केटिंग हेड निखिल सोसले आणि इतर तीन कर्मचा-यां ताब्यात घेण्यातले आहे.

#ArrestKohli : सोशल मीडियावर का उसळली टीकेची लाट?

बेंगळुरुमधील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर #ArrestKohli हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. अनेक नेटक-यांनी विराट कोहलीवर टीका करत त्याला या दुर्घटनेसाठी जबाबदार ठरवले आहे. काहींनी असा दावा केला आहे की, कोहलीने विजयोत्सवात सहभाग घेतला आणि स्टेडियमच्या बाहेर घडलेल्या दुर्घटनेबाबत पुरेशी संवेदनशीलता दाखवली नाही. एका यूजरने म्हटले की, ‘विराट कोहलीने मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली का? त्याने लंडनला जाण्याचा प्रवास का पुढे ढकलला नाही? #ArrestKohli’

5 जून रोजी कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांना मुंबई विमानतळावर पाहण्यात आले, ज्यामुळे काहींनी त्याच्या लंडन प्रवासाला ‘असंवेदशील’ ठरवले.

काही नेटकऱ्यांनी प्रश्न विचारले की, ‘ट्रॉफीचा आनंद प्राधान्याचा की नागरिकांचे प्राण?’, ‘सेलिब्रेशनला थांबवून शोक व्यक्त करणे गरजेचे नव्हते का?’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news