

युएईमध्ये सुरु असलेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये भारत पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून हरल्यानंतर सामन्याचे अखेरचे षटक टाकणारा मोहम्मद शमी ट्रोलिंगचा शिका झाला होता. अनेक विकृत नेटकऱ्यांनी त्याच्या देशभक्तीवर, धर्मावर खालच्या पातळीवर जाऊन कमेंट केल्या होत्या. यावर देशभरातील अनेक खेळाडू आणि मान्यवर व्यक्तींनी मोहम्मद शमीला पाठिंबा दिला होता. मात्र या प्रकरणावर टीम इंडियातून किंवा बीसीसीआयकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती. अखेर ती प्रतिक्रिया आज आली.
टी २० वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध भारताचा १० विकेट्सनी दारूण पराभव झाला. या सामन्यातील अखेरचे १८ वे षटक हे मोहम्मद शमीने टाकले होते. त्याच्याच षटकात पाकिस्तानने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र सामन्यांतर सोशल मीडियावर भारतीय इतर खेळाडूंना सोडून फक्त मोहम्मद शमी ट्रोलिंगचा शिकार झाला. ट्विटवर काही काळ या विकृत नेटकऱ्यांनी गद्दार हा हॅशटॅगही ट्रेंड केला होता.
मात्र त्यानंतर लगेचच भारताच्या माजी खेळाडूंनी मोहम्मद शमीला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट सुरु केल्या. यात भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग आघाडीवर होता. त्यानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही ट्वीट करुन मोहम्मद शमीला पाठिंबा दिला.
मात्र टीम इंडियाकडून किंवा बीसीसीआयकडून या प्रकरणावर काही प्रतिक्रिया आल्या नव्हत्या. आता बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट केले आहे. त्यांनी मोहम्मद शमीचा फोटो शेअर करुन त्याला अभिमान, ताकद, आजपर्यंत आणि यापुढेही असे कॅप्शन दिले. या कॅप्शनमध्ये भारताचा झेंडाही वापरण्यात आला आहे. या चार शब्दाच्या ट्विटवरुन बीसीसीआयने मोहम्मद शमीला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
हेही वाचा :