टीम इंडिया मालामाल... BCCI ने जाहीर केले १२५ कोटी रुपयांचे बक्षीस

BCCI सचिव जय शाह यांची घोषणा
T20 World Cup 2024
टी20 विश्‍वविजेत्‍या भारतीय क्रिकेट संघाला BCCIने भरघोस बक्षीस जाहीर केले आहे. Twitter

टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत विश्‍वचषकावर आपलं नाव कोरलं. तब्‍बल ११ वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्‍काळ संपवला. या विजयानिमित भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI) ने टीम इंडियाला भरघोस बक्षीस रकमेची घोषणा केली आहे.

T20 World Cup 2024
T20 World Cup|T20 विश्वचषक जिंकल्यानंतर PM मोदींचा भारतीय संघाशी फोनवरून संवाद

शनिवारी, 29 जून रोजी केन्सिंग्टन ओव्हलवर झालेल्या अंतिम सामन्यातील ऐतिहासिक विजयानंतर, BCCI सचिव जय शाह यांनी संपूर्ण संघासाठी भरघोस बक्षीस रक्कम जाहीर केली. संपूर्ण टीमचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करताना जय शाह यांनी त्यांच्या X खात्यावर ही घोषणा केली.

T20 World Cup 2024
T20 WC Final : दक्षिण आफ्रिकेने 'चोकर्स' बिरुद राखले कायम!

जय शहा यांनी आपल्‍या X पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, “ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 जिंकल्याबद्दल टीम इंडियासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे. संघाने संपूर्ण स्पर्धेत अपवादात्मक प्रतिभा, दृढनिश्चय आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन!,”

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news