IND vs BAN 1st ODI : बांगलादेशच्या अखेरच्या जोडीने भारताचा विजयाचा घास हिरावला

IND vs BAN 1st ODI : बांगलादेशच्या अखेरच्या जोडीने भारताचा विजयाचा घास हिरावला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN 1st ODI)  यांच्यातील तीन वनडे मालिकेतील पहिला सामना आज (दि.०४) मीरपूर येथे सुरु आहे.

बांगलादेश बॅकफूटवर

सिराजने सामन्यात शानदाक कामगिरी करत बांगलादेशच्या फलंदाजांना एका पाठोपाठ बाद केले. त्याने सामन्याच्या ४० व्या षटकात हसन महमूदला बाद केले त्याने महमूदला शून्य धावांवर बाद केले. सामन्याच्या ३९ व्या षटकात बांगलादेशचा खेळाडू इबादत हुसेन हिट विकेटने बाद झाला. या विकेटमुळे बांगलादेश बॅकफूटवर गेला. आहे.

बांगलादेशला सातवा धक्का; अफिफ हुसेन बाद

सामन्याच्या ३९ व्या षटकांत भारताचा गोलंदाज कुलदीप सेनेन अफिफ हुसेनला सिराजकरवी झेलबाद करत बांगलादेशला सातवा धक्का दिला. या विेकेटमुळे भारताने सामन्यात कमबॅक केला. हुसेन ६ धावाकरून बाद केला.

बांगलादेशला सलग दोन धक्के

सामन्याच्या ३५ व्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर शार्दुलने मोहमदुल्लाहला बाद करत बांगलादेशला पाचवा धक्का दिला. यावेळी मोहमदुल्लाहेन ३५ चेंडूत १५ धावांची खेळी केली. होती. त्याच्यानंतर सामन्यातील ३६ व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर मुशफिकुरला बाद करत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराने सेट झालेली जोडी फोडून मोक्याच्या क्षणी भारताने सामन्यात पुनरागमन केले. यावेळी मुशफिकुर ४५ चेंडूत १८ धावाकरून बाद झाला.

बांगलादेशला मोठा धक्‍का, शाकिब बाद

कर्णधार लिटन दास बाद झाल्‍यानंतर संघाची धुरा शाकिब हसनवरी आली. त्‍याला चांगला सूरही गवसला होता. मात्र २९ धावांवर खेळणार्‍या शाकिबला वॉशिंग्‍टन सुंदरने झेलबाद केले. विराट कोहलीने अप्रितिम झेल पकडत बांगलादेशला मोठा धक्‍का दिला. २६ षटकांचा खेळानंतर बांगलादेशने ४ गडी गमावत १०० धावांचा टप्‍पा पूर्ण केला आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशसमोर १८७ धावांचे आव्‍हान ठेवले. बांगलादेशला सलग दोन धक्‍के बसल्‍यानंतर लिटन दास आणि शाकिब हसन यांनी बांगलादेशचा डाव सावरला. लिटन दास हा ३५ धावांवर तर शाकिब हसन १२ धावांवर खेळत होते. १८ षटकांच्‍या खेळानंतर बांगलादेशने २ गडी गमावत ६८ धावा केल्‍या. मात्र वॉशिंग्‍टन सुंदर याने ही भागीदारी मोडली. त्‍याने लिटन दासला यष्‍टीरक्षक केएल राहुल करवी झेलबाद केले. बांगलादेशने २३  षटकामध्‍ये ३ गडी गमावत ९५ धावा केल्‍या आहेत.

बांगलादेशला सलग दोन धक्‍के

बांगलादेशला पहिल्‍या चेंडूवर झटका बसला. दीपक चहर याने पहिल्‍या षटकामध्‍ये पहिल्‍य चेडूवर सलामीवरी नजमुल शांतोला स्‍लिपमध्‍ये झेल देणे भाग पाडले. रोहित शर्माने झेल पकडत नजमुला तंबूत धाडले. यानंतर १० व्‍या षटकामध्‍ये मोहम्‍मद सिराज याने अनामूला बाद केले. त्‍याने २९ चेंडूत १४ धावा केल्‍या. बांगलादेशने १० षटकांपर्यंत २ गडी गमावत ३० धावा केल्‍या आहेत. लिटन दास आणि शाकिब हसन फलंदाजी करत आहेत.

भारताचे बांगलादेशला १८७ धावांचे आव्‍हान

शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार लिटन दास याचा निर्णय सार्थ ठरवत शाकिब हसन आणि मेहदी मिराज यांनी भारताला जेरीस आणले.  केएल राहुल याने चिवट फलंदाजीचे दर्शन घवडवीत भारताचा डाव सावरला. एका बाजूला विकेट जाण्याचा क्रम सुरूच असताना त्याने दमदार फलंदाजी करत ७० चेंडूत ७३ धावा फटकावल्या. त्याच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर भारताला बांग्लादेशसमोर 186 धावांचे आव्हान ठेवण्यात यश मिळाले.

शाकिबने घेतले पाच बळी

भारताच्‍या डावाची सुरुवात सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन यांनी संथ सुरुवात केली. ५.२ व्या षटकात शिखर धवन १७ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. मेंहदी हसनने त्याला माघारी पाठवले. यानंतर कर्णधार रोहित शर्मा याला २७ धावांवर तर विराट कोहलीला ९ धावांवर शाकिब हसनने तंबूत धाडले.

श्रेयस अय्‍यर व के.एल. राहुल यांनी भारताचा डाव सावरण्‍यचा प्रयत्‍न केला. १७ षटकांच्‍या खेळानंतर भारताने ३ गडी गमावत ८० धावा केल्‍या. 92 धावांच्या स्कोअरवर भारताची चौथी विकेट पडली. इबादत हसनने श्रेयस अय्यरला बाद केले. त्‍याने 39 चेंडूत 24 धावा केल्‍या. केएल राहुलने अर्धशतक झळकावत १५२ पर्यंत धावसंख्या नेली. तर संदरने ४० चेंडूत १९ धावा फटकावत भारताचा डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न केला.

केएल राहुलची दमदार फलंदाजी

मात्र डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न करणार्‍या वॉशिंग्‍टन सुंदरला ३३ षटकामध्‍ये शाकिबने बाद केले. त्‍याने ४३ चेंडूत १९ धावा केल्या. यानंतर ३४ व्‍या षटकात एबादोत हुसेन याने शाहबाज अहमदला शून्‍य धावांवर तर शाकिबने शार्दुलला दोन धावांवर त्रीफळाचीत केले.  शाकिबने चहरला शून्‍य धावावर यष्‍टचीत केले. भारताने ३५ षटकांमध्‍ये आठ गडी गमावत १५८ धावा केल्‍या.केएल राहूल ७० चेंडूत ७३ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि चार षटकार मारले. भारताची १० वी विकेट मोहम्मद सिराजच्या रूपाने पडली. इबादत हसनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. सिराजने २० चेंडूत नऊ धावा केल्या. या सामन्यात भारतीय संघ पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही. ४१.२ षटकात संपूर्ण संघ १८६ धावांवर बाद झाला.

कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघात कुलदीप सेनला पदार्पण करण्याची संधी दिली. तर चार ऑलराउंडरसह तो मैदानात उतरला होता. दरम्यान, बीसीसीआय मेडिकल टीमचा सल्ला घेतल्यानंतर एकदिवसीय संघातून ऋषभ पंतला संघातून  वगळण्‍यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news