Glenn Maxwell retirement : 'अलविदा' वन-डे क्रिकेट...ऑस्‍ट्रेलियाच्‍या ग्लेन मॅक्सवेलनेही जाहीर केली निवृत्ती!

वन-डेच्‍या दोन विश्‍वचषकांच्‍या विजयामध्‍ये बजावली होती मोलाची कामगिरी
Glenn Maxwell
ग्‍लेन मॅक्‍सवेल.File Photo
Published on
Updated on

Glenn Maxwell retirement : ऑस्‍ट्रेलियाचा अष्‍टपैलू खेळाडू ग्‍लेन मॅक्‍सवेल ( Glenn Maxwell) याने वन-डे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्‍याची घोषणा कली आहे. त्‍याने २०२७ मधील विश्‍वचषक स्‍पर्धेत खेळण्‍यास असमर्थता दर्शविली आहे. वन-डे फॉर्मेटमधून निवृत्त झाला असला तरी तो टी-२० मध्ये आपली कारकीर्द सुरू ठेवणार आहे. ऑस्‍ट्रेलिया वन-डे संघातील स्‍टार क्रिकेटपटू मार्कस स्टोइनिस, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पाठोपाठ आता मॅक्‍सवेलनेही निवृत्तीची घोषणा केल्‍याने गतविजेत्‍या वन-डे विश्‍वचषक विजेता संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

ग्‍लेन मॅक्‍सवेलची झंझावाती कारकीर्द

मॅक्‍सवेल २०१२ मध्‍ये ऑस्‍ट्रेलिया वन-डे संघात निवडला गेला. त्‍याने १४९ सामन्यांत ३३.८१ च्या सरासरीने ३९९० धावा त्‍याच्‍या नावावर आहेत. त्‍याच्‍या नावावर असणारा १२६.७० च्या स्ट्राइक रेट हा वन-डेच्‍या इतिहासात किमान २००० धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक आहे. ऑफ-स्पिन गोलंदाजी आणि उत्‍क्‍ष्‍ट क्षेत्ररक्षण हे नेहमीच चर्चेचा विषय ठरले होते. त्‍याच्‍या नावावर ७७ बळी आहेत.

Glenn Maxwell
Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेल लग्न पत्रिकेवरून सासूरवाडीच्‍या नातेवाईकांवर भडकला, म्हणाला…

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर निवृत्तीचा निर्णय फक्‍का

एका पॉडकास्‍टमध्‍ये बोलताना मॅक्‍सवेलने सांगितले की, "मला वाटते की ऑस्‍ट्रेलियाच्‍या वन-डे संघातील माझ्या जागी दुसरा खेळाडू खेळवण्‍याचे नियोजन सुरू करण्याची वेळ आली आहे. बोटाला झालेल्‍या दुखापतीमुळे यंदा तो इंडियन प्रीमियर लीगमधूनही बाहेर पडला होता. मॅक्सवेलने स्पष्ट केले की, चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय पक्का झाला होता. मागील काही दिवसांमध्‍ये मला जाणवत होतं की, ५० षटकांच्या क्रिकेटसाठी शरीर साथ देत नाही. या फार्मेटमध्‍ये टिकून राहणे एक थकवणारे काम आहे."

Glenn Maxwell
Glenn Maxwell : मॅक्सवेलचा विराट कोहली सोबत फलंदाजी करण्यास नकार, कारण…

मॅक्सवेल आणि वन-डे २०२३ विश्‍वचषक...

मॅक्‍सवेलच्‍या वन-डे कारकीर्दीतील सर्वोच्‍च क्षण म्‍हणजे २०२३ च्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्धचा उपांत्‍य सामना. ऑस्ट्रेलिया २९२ धावांचा पाठलाग करताना ७ बाद ९१ अशा अवस्‍था झाली होती. या सामन्‍यात मॅक्‍सवेल सहाव्या क्रमांकावर खेळायला आला. जखमी असूनही त्‍याने झळकावलेले द्विशतक संस्‍मरणीय ठरेल. वन-डेमध्‍ये लक्ष्‍याचा पाठलाग करताना द्विशतक झळकविणारा मॅक्‍सवेलहा पहिला ऑस्‍ट्रेलियन फलंदाज ठरला होता. त्‍याच्‍या खेळीने ऑस्‍ट्रेलिया संघाने अंतिम सामन्‍यात धडक मारली होती. विशेष म्‍हणजे वन-डे विश्‍वचषक जिंकणार्‍या दोन संघात त्‍याचा समावेश होता. याच स्‍पर्धेत त्‍याने नेदरलँड्सविरुद्ध फक्त ४० चेंडूत एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात जलद शतक नोंदवले होते. त्याच्यानावावर ५१ चेंडूत चौथे सर्वात जलद एकदिवसीय विश्वचषक शतक देखील आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग यांनी म्‍हटलं आहे की, मॅक्सवेलने वन-डे फॉरमॅटमध्ये जे काही साध्य केले आहे त्यासाठी ऑस्ट्रेलिया त्याचे ऋणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news