Glenn Maxwell : मॅक्सवेलचा विराट कोहली सोबत फलंदाजी करण्यास नकार, कारण…

Glenn Maxwell : मॅक्सवेलचा विराट कोहली सोबत फलंदाजी करण्यास नकार, कारण…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामातील 49 वा लीग सामना पुण्यातील MCA स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये आरसीबीच्या संघाने हा सामना 13 धावांनी जिंकून या मोसमातील आपला 6वा विजय नोंदवला. या विजयानंतर प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्याच्या त्यांच्या आशा अजूनही जिवंत आहेत. (Glenn Maxwell)

चेन्नईविरुद्धचा विजय आरसीबीसाठी तितकासा सोपा नव्हता, कारण प्रतिस्पर्धी संघाला दिलेले लक्ष्य गाठू न देणे हे कठीण होते. हा विजय आरसीबीसाठी खूप महत्त्वाचा होता कारण याआधी संघाला मागील तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे गुणतालिकेत त्यांची स्थिती थोडी गंभीर दिसू लागली होती. संघ तळात जात होता. मात्र, कालच्या चेन्नईवरील विजयानंतर आरसीबी संघाच्या ड्रेसिंग रूमचे वातावरणही अतिशय प्रेक्षणीय झाले. सर्व खेळाडूंसह संघाच्या इतर सदस्यांनी आनंदोत्सव साजरा केला. याचा एक व्हिडिओ फ्रँचायझीने यूट्यूबवर पोस्ट केलेला आहे. (Glenn Maxwell)

दरम्यान, या सामन्यादरम्यान घडलेल्या एका खास घटनेबाबत इथे चर्चा करायची आहे. चला तर जाणून घेवू या….

आरसीबी संघाच्या फलंदाजीदरम्यान माजी कर्णधार विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळाली. वास्तविक, जेव्हा मॅक्सवेल फलंदाजीसाठी आला तेव्हा विराट कोहली क्रीझवर उपस्थित होता. (Glenn Maxwell)

आता सर्वांना माहित आहे की, फलंदाजी करताना विराट कोहली खेळपट्टीवर वेगाने धावतो. तो एकेरी धाव दुहेरीमध्ये बदलू शकतो. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील खेळाडू विराटच्या धाव घेण्याच्या वेगाचा अंदाज लावू शकत नाही. अशा परिस्थितीत त्याच्यासोबत फलंदाजी करणाऱ्या खेळाडूलाही सावधगिरी बाळगावी लागते. कारण एका चुकीमुळे तो धावबाद होण्याची शक्यता असते. कालच्या सामन्यात असाच प्रसंग ग्लेन मॅक्सवेलच्या बाबतीत घडला.

तू एकेरी धाव दुहेरीमध्ये बदलू शकतोस मी नाही…. : ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)

आरसीबीने शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये ग्लेन मॅक्सवेल म्हणाला, 'मी तुझ्यासोबत फलंदाजी करू शकत नाही, तू खूप वेगाने धावतोस. तू एकेरी धाव दुहेरीमध्ये बदलू शकतोस, मी नाही.'

दरम्यान, कोहलीने या क्लिपच्या सुरुवातीलाच म्हटले होते की, आतापर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान जखमी झालेला खेळाडू तू आहेस. मात्र, भारताच्या माजी कर्णधाराने नंतर मॅक्‍सवेलच्या मॅच-विनिंग गोलंदाजी कामगिरीचे कौतुक केले.

CSK विरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने आपल्या गोलंदाजीने धोकादायक रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडूला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 22 धावा देऊन महत्त्वाचे 2 बळी मिळवले. त्यानंतर कोहली म्हणाला की, प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी हा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. इतिहासातील महान जखमी खेळाडूने या सामन्यात 4 षटकात 22 धावा देत 2 बळी घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news