AUS vs WI : ‘WTC Final’मधील पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कसोटी संघात बदल, विंडिजविरुद्धच्या मालिकेसाठीअनकॅप्ड अष्टपैलूचा समावेश

वेगवान गोलंदाज ब्रेंडन डॉगेटला दुखापत झाल्याने तो विंडिज दौऱ्यातून बाहेर पडला आहे
australia vs west indies test series australia squad big change
Published on
Updated on

australia vs west indies test series australia squad big change

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ आता WTC च्या चौथ्या पर्वातील आपल्या पहिल्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ही मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध कॅरेबियन भूमीवर 25 जूनपासून सुरू होत आहे. या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती, मात्र आता त्यात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

ब्रेंडन डॉगेटच्या जागी सीन ॲबॉटला संधी

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, वेगवान गोलंदाज ब्रेंडन डॉगेटला दुखापत झाल्याने तो विंडिज दौऱ्यातून बाहेर पडला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी डॉगेटला राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान मिळाले होते. आता तो इंग्लंडहून थेट मायदेशी परतला आहे. त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू सीन ॲबॉटला संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ॲबॉटने अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही, मात्र त्याने वनडे आणि टी-20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका दौऱ्यासाठीही ॲबॉटची निवड झाली होती, परंतु त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. ॲबॉटने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 88 सामने खेळले असून, त्यात त्याने 30.29 च्या सरासरीने 267 बळी घेतले आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यादरम्यान स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना स्टीव्ह स्मिथच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या फिटनेसबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. स्मिथला शस्त्रक्रिया करावी लागणार नसली तरी, त्याला पुढील काही आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे त्याची अनुपलब्धता ऑस्ट्रेलियन संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकते.

ऑस्ट्रेलियाचा संघ :

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ॲलेक्स कॅरी, मॅट कुहनेमन, जोश हेझलवूड, नॅथन लायन, सीन ॲबॉट, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड.

वेस्ट इंडिज संघ :

रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॉरिकन (उपकर्णधार), केव्हलन अँडरसन, क्रेग ब्रॅथवेट, जॉन कॅम्पबेल, केसी कार्टी, जस्टिन ग्रीव्हज, शाई होप, टेव्हिन इमलाच, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, जोहान लेने, मिकाइल लुईस, अँडरसन फिलिप, जेडन सील्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news