T20 World Cup 2026 | भारतीय महिला संघाचे आव्हान संपुष्टात; ऑस्ट्रेलियाकडून ६ गडी राखून पराभव

Ellyse Perry
एलिस पेरी
Published on
Updated on

लंडन; वृत्तसंस्‍था : भारतीय महिला क्रिकेट संघाचे टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. रविवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात सहा वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. या पराभवासोबतच भारतीय संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून, ऑस्ट्रेलियाने दिमाखात उपांत्‍य फेरीत धडक मारली.

सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत ४ बाद १७० धावांचा आव्हानात्मक धावसंख्या उभारली. कर्णधार हरमनप्रीत कौरने शानदार फलंदाजी करत ५६ धावांची उत्कृष्ट अर्धशतकी खेळी केली. तिला सलामीवीर स्मृती मानधना (३८ धावा) आणि शेफाली वर्मा (३४ धावा) यांनी चांगल्या धावा जोडून मजबूत सुरुवात करून दिली होती. १७१ धावांचे मोठे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या अनुभवाच्या जोरावर अवघ्या १९ षटकांत ४ गडी गमावून हे उद्दिष्ट गाठले. ऑस्ट्रेलियाच्या विजयात अनुभवी एलिस पेरी (५६ धावा) आणि ॲशले गार्डनर (नाबाद ५३ धावा) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

संक्षिप्‍त धावफलक

भारत : २० षटकांत ४/१७० (हरमनप्रीत कौर २७ चेंडूंत ५६, स्मृती मानधना ३८, जेमिमा व शेफाली प्रत्येकी ३४ धावा. सोफी २/४६).

ऑस्‍ट्रेलिया : १९ षटकांत ४/१७२. (एलिस पेरी ५६, ॲश्‍ले गार्डनर नाबाद ५३, जॉर्जिया वेरहॅम नाबाद ४).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news