AUS vs SA ODI : ऑस्ट्रेलियाची शरणागती! द. आफ्रिकेविरुद्धच्या दुस-या वनडेत लाजिरवाणा पराभव

द. आफ्रिका संघाने सलग दुसऱ्या सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.
aus vs sa odi series south africa beat australia by 84 runs in 2nd odi match
Published on
Updated on

south africa beat australia by 84 runs in 2nd odi match

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत द. आफ्रिकेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवत द. आफ्रिकेने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही सामन्यांमध्ये द. आफ्रिकेने जवळपास एकतर्फी विजय मिळवला असून, या पराभवामुळे बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघ अक्षरशः गुडघ्यावर आल्याचे चित्र आहे.

प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेच्या २७७ धावा

एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेच्या संघाने २७७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित ५० षटकेही पूर्ण खेळू शकला नाही आणि ४९.१ षटकांतच सर्वबाद झाला. त्यामुळे २७८ धावांचे लक्ष्य असणारी ही धावसंख्या कमी पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. संघाकडून मॅथ्यू ब्रीट्झकेने पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याने ७८ चेंडूंत ८८ धावांची दमदार खेळी केली, जी या सामन्यातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.

aus vs sa odi series south africa beat australia by 84 runs in 2nd odi match
IND va AUS Test : टीम इंडिया पराभवाच्या छायेतून थेट विजयाच्या उंबरठ्यावर! ऑस्ट्रेलियाची अवस्था बिकट

१९३ धावांवर ऑस्ट्रेलिया गारद

केवळ २७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला ऑस्ट्रेलियन संघ लवकरच तंबूत परतला. संपूर्ण संघ ३७.४ षटकांत केवळ १९३ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून केवळ जोश इंग्लिसने एकाकी झुंज दिली. त्याने ७४ चेंडूंत ८७ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला ५० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. इंग्लिसनंतर संघाचा दुसरा सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू कॅमेरॉन ग्रीन होता, ज्याने केवळ ३५ धावांचे योगदान दिले.

aus vs sa odi series south africa beat australia by 84 runs in 2nd odi match
Women's World Cup schedule Change : महिला वनडे विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकात मोठा फेरबदल! बेंगळूरुमधील सामने स्थलांतरित

ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीत घसरण

एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी खालावली असल्याचे चित्र आहे. मागील आठ एकदिवसीय सामन्यांपैकी संघाला केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. संघाने अखेरचा विजय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडविरुद्ध मिळवला होता. यावरून स्पष्ट होते की, कांगारू संघ सध्या कामगिरीतील घसरणीच्या टप्प्यातून जात असून, त्यात सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दुसरीकडे, द. आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या मागील दहा एकदिवसीय मालिकांपैकी आठ मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news