आलिशान कारचे शौकीन क्रीडापटू : मेस्सीची कार 248 कोटींची!

आलिशान कारचे शौकीन क्रीडापटू : मेस्सीची कार 248 कोटींची!
Published on
Updated on

मँचेस्टर : वृत्तसंस्था, कोट्यवधी रुपयांची कमाई करणारे खेळाडू आलिशान घरे, महागड्या कार्सचे भयंकर शौकीन असतात, हे अनेकदा दिसून आले आहे. मँचेस्टर युनायटेडचा दिग्गज फुटबॉलपटू मार्कस रॅशफोर्ड याने अलीकडेच 5.8 कोटी रुपयांची लिमिटेड एडिशन रोल्स रॉयस कार विकत घेतली. या लिमिटेड एडिशनमध्ये अशा प्रकारच्या फक्त 62 युनिटस् उपलब्ध करून देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर महागड्या कार्सच्या शौकीन अ‍ॅथलिटस्वर एक द़ृष्टिक्षेप…

रॅशफोर्डकडे 3 रोल्स रॉयस, 3 मर्सिडीज

रॅशफोर्डने अलीकडेच तिसरी रोल्स रॉयस कार खरेदी केली आहे. त्याच्या 9 आलिशान कारमध्ये 3 रोल्स रॉयस व 3 मर्सिडीजचा समावेश आहे. 661.8 कोटींच्या नेटवर्थमधून त्याने 16.5 कोटी रुपये केवळ कारवरच खर्च केले आहेत.

15 कार्सवर मेस्सीचा खर्च 400 कोटी

अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लियोनेल मेस्सीच्या ताफ्यात 15 पेक्षा अधिक कार आहेत. यासाठी त्याने 400 कोटींपेक्षा अधिक रक्कम उधळली आहे. यातील सर्वात महागडी कार 1957 मधील फेरारी असून या कारची किंमत थोडीथोडकी नव्हे तर 248 कोटी इतकी आहे.

रोनाल्डोकडे 73 कोटींची लिमिटेड एडिशन बुगाटी

पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू रोनाल्डो 25 आलिशान, लक्झरी कारचा मालक आहे. 73.6 कोटी रुपयांची 2022 मॉडेलची बुगाटी ही त्याची सर्वात महागडी कार. ही लिमिटेड एडिशन कार जगात फक्त 10 जणांकडे आहे.

अमेरिकन मुष्टियोद्धा मेवेदर लॅम्बोर्गिनीचा फॅन

अमेरिकेचा दिग्गज मुष्टियोद्धा फ्लॉयड मेवेदरकडे एकेकाळी 100 कार्सचा ताफा होता. आता त्याच्या ताफ्यात मॅक्लेरेन, लॅम्बोर्गिनी, मर्सिडीज अशा 16 मोजक्या कार आहेत. त्याच्या सर्वात महागड्या कारची किंमत 4 कोटी रुपये इतकी आहे.

जॉर्डनने विकत घेतली 3.3 कोटींची रोडस्टर

मायकल जॉर्डनच्या गॅरेजमध्ये 70.32 कोटी रुपयांच्या आलिशान कार आहेत. यातील सर्वात महागडी कार रेव्हेल्यूशन रोडस्टर ही आहे. ही कार त्याने अलीकडेच आपल्या ताफ्यात समाविष्ट केली आहे. या कारची किंमत 3.3 कोटी इतकी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news