Asia Cup Hockey : हरमनप्रीत ‘हिरो’.. जपान झिरो! भारताचा सलग दुसरा विजय

आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारताने जपानला 3-2 फरकाने नमवले
Asia Cup Hockey : हरमनप्रीत ‘हिरो’.. जपान झिरो! भारताचा सलग दुसरा विजय
Published on
Updated on

राजगीर : आशिया चषक हॉकी स्पर्धेत रविवारी ‘अ’ गटातील आपल्या दुसर्‍या सामन्यात भारताने जपानवर 3-2 असा रोमहर्षक विजय मिळवला. भारताचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय असून, यासह गुणतालिकेतील संघाचे स्थान आणखी भरभक्कम झाले आहे.

कर्णधार हरमनप्रीत सिंग पुन्हा एकदा संघासाठी निर्णायक ठरला. त्याने केलेल्या दोन महत्त्वपूर्ण गोलांच्या जोरावर संघाचा विजय सुकर ठरला. हरमनप्रीतने पाचव्या मिनिटाला पहिला गोल करून भारताला सुरुवातीची आघाडी मिळवून दिली, तर जपानने बरोबरी साधल्यानंतर 46 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवून संघाला पुन्हा आघाडीवर आणले.

तत्पूर्वी, मनदीप सिंगने चौथ्या मिनिटाला, तर हरमनप्रीत सिंगने पाचव्या मिनिटाला गोल करून भारताला सुरुवातीलाच 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. प्रत्युत्तरात जपानकडून कोसेई कावाबेने 38 व्या मिनिटाला पहिला, तर 59 व्या मिनिटाला गोल करून सामन्यात रंगत आणली. त्यानंतर हरमनप्रीतने 46 व्या मिनिटाला केलेला वैयक्तिक दुसरा व सांघिक तिसरा गोल अखेरीस भारतासाठी निर्णायक ठरला.

कावाबेच्या प्रयत्नांनंतरही, भारतीय संघाने आपली आघाडी कायम राखली. विशेषतः सामन्याच्या अखेरच्या क्षणांमध्ये बचावफळीने संयम आणि अनुभवाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. या विजयापूर्वी भारताने शुक्रवारी झालेल्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात चीनवर 4-3 असा निसटता विजय मिळवला होता. यातून यजमान संघाची आक्रमक खेळाची ताकद दिसून आली.

हरमनप्रीत सिंग आणि मनदीप सिंगसारखे प्रमुख खेळाडू उत्कृष्ट फॉर्मात आहेत आणि संघ दबावाखाली चांगली कामगिरी करत असल्याने, साखळी फेरीतील उर्वरित सामन्यांमध्ये आणि त्यानंतरही ही विजयी घोडदौड कायम ठेवण्याचे भारताचे लक्ष्य असेल.

भारताची आज कझाकिस्तानविरुद्ध शेवटची साखळी लढत

सलग दोन विजयांमुळे भारताने ‘अ’ गटात आपले स्थान मजबूत केले आहे. आता आज (दि. 1) कझाकिस्तानविरुद्ध होणार्‍या शेवटच्या साखळी सामन्यात हीच विजयी लय कायम ठेवण्याचा संघाचा प्रयत्न असेल.

विजेत्या संघास मिळणार आगामी वर्ल्डकपचे तिकीट

आशिया चषकाचा विजेता संघ पुढील वर्षी बेल्जियम आणि नेदरलँडस् येथे संयुक्तपणे आयोजित होणार्‍या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरेल. चीन आणि जपानविरुद्धचे विजय मिळवल्याने स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून थेट विश्वचषकात प्रवेश मिळवण्याचा भारताचा निर्धारच जणू अधोरेखित झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news