![Asia Cup 2023 : आशिया चषक जिंकल्यानंतर भारताला मिळाले सव्वा कोटी रुपये](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F09%2FOnly-For-SHAMBHURAJ30-12.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कोलंबो; वृत्तसंस्था : आशिया कप फायनलमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत विक्रमी आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडिया मालामाल बनलीच; परंतु फिरकी गोलंदाज कुलदीप यादवही मालामाल झाला आहे. भारतीय संघाला अंदाजे 1.24 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. त्याचवेळी, उपविजेत्या श्रीलंकेलादेखील अंदाजे 62 लाख रुपये मिळाले आहेत.
रवींद्र जडेजा : 3000 डॉलर्स (2.49 लाख) सर्वोत्कृष्ट कॅच ऑफ द मॅच
मोहम्मद सिराज : 5000 डॉलर्स (रु. 4.15 लाख) आणि ट्रॉफी, सामनावीर
कुलदीप यादव : 50,000 डॉलर्स (रु. 41.54 लाख) स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू
श्रीलंका : उपविजेत्या संघाला 75,000 डॉलर्स (रु. 62.31 लाख)
भारत : विजेत्या संघाला 150,000 डॉलर्स (रु. 1.24 कोटी).