Australian Cricketer Controversy : दोघींमध्ये ‘तिसरी’; पहिली रुसली!, ऑस्ट्रेलियन समलिंगी महिला खेळाडूंच्या संसाराला सुरुंग

ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये खळबळ, डेटिंग ॲपवरील प्रेमाचा वर्षभरातच शेवट
Australian Cricketer Controversy : दोघींमध्ये ‘तिसरी’; पहिली रुसली!, ऑस्ट्रेलियन समलिंगी महिला खेळाडूंच्या संसाराला सुरुंग
Published on
Updated on

सिडनी : ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू ॲश्ले गार्डनर सध्या तिच्या मैदानातील कामगिरीमुळे नव्हे, तर खाजगी आयुष्यातील अत्यंत धक्कादायक वादामुळे चर्चेत आली आहे. गार्डनर हिची पत्नी मोनिका राइट हिने सोशल मीडियावर थेट फसवणुकीचे गंभीर आरोप केले असून, एका सहकारी महिला क्रिकेटपटूमुळेच आपला संसार मोडल्याचा दावा केला आहे. या अंतर्गत वादाची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे. ज्यामुळे क्रीडा जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

डेटिंग ॲपवरील प्रेमाचा असा झाला शेवट

वृत्तानुसार, ॲश्ले गार्डनर आणि मोनिका राइट यांची पहिली भेट २०२० मध्ये एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून झाली होती. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये त्यांनी एकमेकांना विवाहासाठी प्रपोज केले आणि एप्रिल २०२५ मध्ये 'ब्लू माउंटेन्स' येथे अत्यंत थाटामाटात या दोघींनी लग्नगाठ बांधली. विवाहानंतर सुरुवातीला सर्वकाही सुरळीत सुरू असल्याचे दिसत होते, मात्र अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाली.

भारत दौऱ्यादरम्यान संशयाची ठिणगी

गेल्या वर्षी भारतात आयोजित करण्यात आलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेदरम्यान मोनिकाला पहिल्यांदा ॲश्लेच्या वागण्यात बदल जाणवला. ॲश्लेचे अचानक बदललेले वर्तन पाहून मोनिका थेट स्पर्धा सुरू असतानाच भारतात पोहोचली. मात्र, भारतात एकत्र वेळ घालवूनही त्यांच्यातील तणाव कमी झाला नाही आणि नात्यातील दुरावा स्पष्ट जाणवू लागला.

ऑस्ट्रेलियात परतल्यानंतर सत्य आले समोर

'डेली मेल'च्या अहवालानुसार, भारताहून ऑस्ट्रेलियात परतल्यानंतर या दोघींमध्ये सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान ॲश्लेने कथितपणे काही गोष्टी कबूल केल्या, ज्यामुळे मोनिकाला प्रचंड मानसिक धक्का बसला. यानंतर काही दिवसांतच त्या एकमेकांपासून विभक्त झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या नोव्हेंबर महिन्यातच या दोघींचे मार्ग वेगळे झाले होते, मात्र ही माहिती आता जाहीर झाली आहे.

'या' महिला खेळाडूमुळे मोडला संसार? पत्नीचा थेट आरोप

हा वाद सोमवारी (दि. १३) अधिकच पेटला, जेव्हा मोनिका राइट हिने सोशल मीडियावर 'डेली मेल'च्या वृत्ताचा स्क्रीनशॉट शेअर केला. इतकेच नव्हे तर, तिने ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील फलंदाज जॉर्जिया वोल हिचा फोटो पोस्ट करत खळबळजनक कॅप्शन लिहिले. ‘हिच ती खेळाडू आहे, जिच्यासोबत माझ्या पत्नीने माझी फसवणूक केली,’ असा थेट आरोप मोनिकाने केला. मात्र, मोनिकाच्या या गंभीर आरोपावर ॲश्ले गार्डनर किंवा जॉर्जिया वोल या दोघींकडूनही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

फॅमिली प्लॅनिंगची स्वप्ने राहिली अपूर्ण

या दोघी आपल्या कुटुंबाचा विस्तार करण्याची तयारी करत होत्या, असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी फर्टिलिटी क्लिनिकला भेट देण्याचेही नियोजन केले होते, परंतु नात्यात आलेल्या वादळामुळे ही योजना अपूर्णच राहिली. त्यातच एक दिवस ॲश्ले अचानक सिडनी येथील त्यांचे सामायिक घर सोडून निघून गेली. जाताना तिने स्वतःचे सर्व सामान सोबत नेले, मात्र घरात केवळ दोघींच्या लग्नाच्या अंगठ्या मागे सोडून गेल्याचे समोर आले आहे.

कर्णधारपद मिळाले, पण नाते वाचवण्यात अपयश

विशेष म्हणजे, नोव्हेंबर महिन्यात जेव्हा ॲश्ले गार्डनरकडे 'सिडनी सिक्सर्स'चे कर्णधारपद आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले, तेव्हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीला तिच्या खाजगी आयुष्यातील या वादाची पूर्ण कल्पना होती, असाही दावा केला जात आहे. या संपूर्ण काळात ॲश्लेने तिचे वैवाहिक नाते वाचवण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यात तिला यश येऊ शकले नाही.

सध्या हे प्रकरण सोशल मीडियासह आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात प्रचंड गाजत आहे. दरम्यान, मोनिकाने केलेल्या फसवणुकीच्या या आरोपांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही आणि दोन्ही बाजूंकडून अधिकृत वक्तव्य येणे बाकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news