Who is Samreen Kaur: अर्शदीप सिंगची 'रुमर्ड गर्लफ्रेंड' समरीन कौर कोण? त्याच्या पेक्षा किती वर्षांनी लहान आहे?

Arshdeep Singh Girlfriend: अर्शदीप सिंगच्या एका फोटोमुळे त्याच्या रिलेशनशिपबाबत चर्चा रंगल्या आहेत. फॅन्सनी टॅटूच्या आधारावर मुलगी समरीन कौर असल्याचा दावा केला आहे.
Arshdeep Singh Girlfriend
Arshdeep Singh GirlfriendPudhari
Published on
Updated on

Who is Samreen Kaur: भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या मैदानावरच नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आला आहे. IPL 2026 मध्ये Punjab Kings साठी खेळणाऱ्या अर्शदीपने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

अर्शदीपने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याने एका मुलीचा हात धरलेला दिसत आहे, मात्र त्या मुलीचा चेहरा दिसत नाही. पण तिच्या हातावर असलेला छोटासा टॅटू आणि नखांवरील नेल आर्ट पाहून सोशल मीडियावरील चाहत्यांनी ती मुलगी समरीन कौर असल्याचा अंदाज लावला आहे. यानंतर दोघे डेट करत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या.

Arshdeep Singh Girlfriend
RBI Action: धक्कादायक! महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला RBIने ठोकले ताळे; ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?

या चर्चेला अधिक हवा मिळाली ती समरीन कौरच्या जुन्या IPL सामन्यांदरम्यानच्या फोटोंमुळे. ती Punjab Kings ला सपोर्ट करताना दिसल्याने चाहत्यांनी या नात्याबाबत चर्चा करायला सुरुवात केली.

समरीन कौर ही पंजाबी इंडस्ट्रीतील उदयोन्मुख अभिनेत्री असून ती सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत आणि तिने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे, 83 या चित्रपटातही ती झळकली होती.

Arshdeep Singh Girlfriend
Sanjiv Goenka Video: LSGचे मालक संजीव गोएंका LIVE सामन्यादरम्यान का रडले? व्हिडिओ आला समोर, नेमकं काय घडलं?

वयाच्या बाबतीत समरीन कौर अर्शदीप सिंगपेक्षा एक वर्षाने लहान आहे. तिचा जन्म जम्मू-काश्मीरमध्ये झाला असून ती सध्या 26 वर्षांची आहे. मात्र, या सर्व चर्चांदरम्यान अर्शदीप सिंग किंवा समरीन कौर यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या नात्याबाबतची चर्चा सध्या केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news