FIFA World Cup 2026 | मेस्‍सी मॅजिक, अर्जेंटिना अपराजित!

साखळी फेरीत जॉर्डनला ३-१ ने लोळवले
FIFA World Cup 2026 |
FIFA World Cup 2026 | मेस्‍सी मॅजिक, अर्जेंटिना अपराजित!
Published on
Updated on

डॅलस; वृत्तसंस्‍था : उत्तरार्धात सबस्टिट्यूट (राखीव खेळाडू) म्हणून मैदानात आलेल्या फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपल्या जादुई खेळाचे प्रदर्शन प्रत्‍यक्षात साकारल्‍यानंतर अर्जेंटिनाने साखळी फेरीतील आपल्‍या शेवटच्‍या लढतीत जॉर्डनचा ३-१ असा पराभव केला आणि साखळी फेरीत अपराजित राहण्‍याचा पराक्रमही गाजवला. यासह मेस्सीने विश्वचषकात सलग सात सामन्यांत गोल करण्याचा नवा ऐतिहासिक जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

प्रारंभी, जिओव्हानी लो सेल्सोने अप्रतिम फ्री-किकवर गोल करत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लाउतारो मार्टिनेझने ही आघाडी २-० अशी दुप्पट केली. दुसऱ्या हाफमध्ये जॉर्डनतर्फे ५४ व्या मिनिटाला मौसा अल-तामारीने उत्कृष्ट गोल करत सामना २-१ अशा रोमांचक स्थितीत आणला. ६० व्या मिनिटाला प्रेक्षकांच्या प्रचंड गदारोळात लिओनेल मेस्सी मैदानावर उतरला आणि ८० व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री-किकवर त्‍याने डाव्या पायाने मारलेला ताकदवान फटका थेट गोलपोस्टचा वेध घेणारा ठरला.

पोर्तुगाल-कोलंबियाची बाद फेरीत धडक

मियामी : ‘के’ गटातील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात मियामीच्या मैदानावर दोन्ही बलाढ्य संघांमध्ये सुरुवातीपासूनच अटीतटीची लढत पाहायला मिळाली. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाविरुद्ध कोलंबियाच्या खेळाडूंनी कमालीचा आक्रमक खेळ केला. कोलंबियाच्या लुईस डायझने पोर्तुगालच्या बचाव फळीला अनेकदा चकवले. परंतु, पोर्तुगालचा गोलकीपर डियोडो कोस्टाने अप्रतिम गोलरक्षण करत कोलंबियाचे गोल करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.

रोनाल्डोचा संघर्ष आणि पोर्तुगालचा बचाव

पोर्तुगालच्या मध्यफळीला कोलंबियाच्या चक्रव्यूहात चेंडूवर योग्य नियंत्रण ठेवता आले नाही. यामुळे कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोला गोल करण्याच्या फार कमी संधी मिळाल्या. ७८ व्या मिनिटाला रोनाल्डोने मारलेला एक ताकदवान शॉट गोलपोस्टच्या अगदी जवळून बाहेर गेला. सामन्याच्या शेवटच्या १० मिनिटांत कोलंबियाने सलग ३ कॉर्नर मिळवून प्रचंड दबाव निर्माण केला होता. मात्र, पोर्तुगालच्या अनुभवी बचाव फळीने सामना ०-० असा बरोबरीत राखण्यात यश मिळवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news