

Afghanistan vs India Asian Games: एशियन गेम्स पुरूषांच्या क्रिकेट क्वार्टर फायनल सामन्यात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होता. मात्र हा सामना पाऊस आणि ओलं मैदान यामुळं अनिर्णित राहिला. नाणेफेकीच्या १६ मिनिटे आधी हा सामना रद्द झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर बारत आता सेमी फायनलमध्ये पोहचला आहे. स्पर्धेचा एक नियम भारताच्या पथ्यावर पडला तर अफगाणिस्तानला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं.
भारत हा आयसीसी टी२० टीम रँकिंगमध्ये अफगाणिस्तानपेक्षा उच्च स्थानावर असल्यानं त्याचा फायदा भारताला झाला अन् सामना वॉशआऊट होऊनही भारत सेमी फायनलमध्ये पोहचला. भारताचा आता पुढचा सामना हा नेपाळ आणि श्रीलंका यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. हा सामना गुरूवारी होणार आहे.
एशियन गेम्ससाठी क्रमवारीत अव्वल असलेले भारत, पाकिस्तान, बांगलादेश हे संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये पोहचले होते. आता श्रीलंका देखील जर नेपाळविरूद्धचा सामना वॉश आऊट झाला तर थेट सेमी फायनलमध्ये पोहचणार आहे. यापूर्वी सोमवारी पाकिस्तान - हाँग काँग यांच्यातील पहिला क्वार्टर फायनल सामना देखील नाणेफेकीपूर्वीच वॉश आऊट झाला होता.
आता अफगाणिस्तानचा भारतासोबतचा सलग दुसऱ्या एशियन गेम्समधील सामना वॉश आऊट झाला आहे. यापूर्वी २०२३ च्या हांग्झहोऊ येथील सामन्यात त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. त्यावेळी भारतासोबतची फायनल १८.२ षटकांच्या खेळानंतर वॉश आऊट झाली होती.