IND vs SA : जोहान्सबर्गमध्ये भारताचा पराभव, द. आफ्रिकेचा ७ विकेटने विजय | पुढारी

IND vs SA : जोहान्सबर्गमध्ये भारताचा पराभव, द. आफ्रिकेचा ७ विकेटने विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क :

जोहान्सबर्ग येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून जिंकली. आफ्रिकेसमोर २४० धावांचे लक्ष्य होते, जे संघाने ३ गडी गमावून सहज गाठले. या विजयासह आफ्रिकन संघाने ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. जोहान्सबर्गच्या मैदानावर २९ वर्षांतील भारताचा हा पहिलाच पराभव आहे.

जोहान्सबर्गमध्ये पहिला पराभव

जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर भारतीय संघाचा २९ वर्षांतील हा पहिलाच पराभव आहे. टीम इंडियाने या मैदानावर १९९२ साली पहिली कसोटी खेळली होती आणि तो सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यापूर्वी भारताने येथे खेळल्या गेलेल्या पाचपैकी दोन कसोटी सामने जिंकले होते, तर तीन सामने अनिर्णित राहिले होते. गेल्या २९ वर्षात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय संघाला कधीही पराभूत करू शकला नाही, पण आज हा ट्रेंडही मोडीत निघाला.

सामन्याच्या दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज अत्यंत सावधपणे फलंदाजी करताना दिसले. २४० धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना डीन एल्गर आणि मार्करमने संघाला पहिल्या विकेटसाठी चांगली सुरुवात करून दिली. सामन्याच्या तिस-या दिवशी त्यांची पहिली विकेट ४७ धावसंख्येवर पडली. मार्कराम ३१ धावांवर शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. त्यानंतर २८ धावांवर अश्विन कीगन पीटरसनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर सामन्याच्या दुस-या दिवशी शमीने भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्याने ४० धावांवर ड्युसेन बाद केले.

भारताचा दुसरा डाव : पुजारा आणि रहाणेची अर्धशतके

सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी पुनरागमन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र तसे झाले नाही. संपूर्ण संघ अवघ्या २६६ धावांत ऑलआऊट झाला. पुजारा आणि रहाणे या दोघांनीही अनुक्रमे ५३ आणि ५८ धावा केल्या. यानंतर हनुमा विहारीनेही ४० धावांचे योगदान दिले. तर शार्दुल ठाकूरने २४ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांसह २८ धावा करत संघाला तारण्याचा प्रयत्न केली. दुसऱ्या डावात कर्णधार केएल राहुलने ८, मयंक अग्रवालने २३, ऋषभ पंतने शून्य धावांचे योगदान दिले.

या सामन्यात विराट कोहली दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या जागी केएल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली. राहुलने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात अवघ्या २०२ धावा केल्या. भारताकडून केएल राहुलने ५० धावा केल्या तर आर अश्विनने ४६ धावांची सर्वात मोठी खेळी केली. पहिल्या डावात भारताच्या २०२ धावांना प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने किगन पीटरसनच्या ६२ आणि टेम्बा बावुमाच्या ५१ धावांच्या जोरावर २२९ धावा केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने पहिल्या डावात ७ विकेट घेतल्या.

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी जोहान्सबर्गमध्ये पाऊस पडला. मैदान भिजले. त्यामुळे दिवसाचा खेळ सुरू होण्यास विलंब झाला. अखेर ५:३० तासांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर खेळ सुरू झाला. पहिली दोन सत्रे पावसाने वाहून गेली. आज किमान ३४ षटके खेळली जातील. आफ्रिकेसमोर २४० धावांचे लक्ष्य असून प्रत्युत्तरात त्यांनी ३ गडी गमावून १८० धावा केल्या आहेत. कर्णधार डीन एल्गरने अर्धशतक पूर्ण केले. त्याने कर्णधारपदाची खेळी खेळताना १३० चेंडूत आपले १९ वे अर्धशतक पूर्ण केले.

Image

व्हॅन डर ड्युसेन बाद…

५४ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शमीच्या खात्यात रायसे व्हॅन डर ड्युसेनची विकेट आली. ड्युसेनचा झेल पहिल्या स्लिपमध्ये चेतेश्वर पुजाराने टिपला. तो ४० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. एल्गर आणि डुसेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. ड्युसेन बाद झाला तेव्हा द. आफ्रिकेची धावसंख्या १७५ होती.

एल्गारचे अर्धशतक..

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने कर्णधारपदाची खेळी खेळताना आपल्या कसोटी कारकिर्दीतील १९वे अर्धशतक झळकावले.

Image

तत्पूर्वी, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात २०२ धावा केल्या. कर्णधार राहुलने सर्वाधिक ५० आणि आर अश्विनने ४६ धावा केल्या. आफ्रिकेकडून मार्को जॉन्सनने चार आणि रबाडा, ऑलिव्हरने प्रत्येकी तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात आफ्रिकेने २२९ धावा केल्या. पीटरसनने ६२ आणि बावुमाने ५१ धावा केल्या. भारताच्या शार्दुल ठाकूरने सात आणि शमीने एक विकेट घेतली.

टीम इंडियाचा दुसरा डाव डावात २६६ धावांत आटोपला. त्यामुळे द. आफ्रिकेला विजयासाठी २४० धावांचे लक्ष्य मिळाले. भारताच्या दुस-या डावात अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ५८ आणि पुजाराने ५३ धावा केल्या. आफ्रिकेच्या रबाडा, एनगिडी आणि जेन्सन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना आफ्रिकन संघाने २ बाद ११८ धावा केल्या. कर्णधार एल्गर ४६ आणि रसी व्हॅन डर डुसेन ११ धावांवर खेळत आहेत. द. आफ्रिकेला विजयासाठी अजून १२२ धावांची गरज आहे.

जोहान्सबर्गमध्ये भारत कधीही हरलेला नाही…

जोहान्सबर्गच्या मैदानावर भारतीय संघाने आतापर्यंत एकही कसोटी सामना गमावलेला नाही. या सामन्यात आफ्रिकेची स्थिती मजबूत असून या मैदानावर प्रथमच दक्षिण आफ्रिका भारताला पराभूत करू शकते. अशी परिस्थिती आहे. मात्र सामन्याच्या चौथ्या दिवशी पाऊस पडत असून सामन्याचा अजून एक दिवस शिल्लक आहे. तरी पावसाचा फायदा भारतीय गोलंदाजांना होऊ शकतो.

Back to top button