Smriti Mandhana : स्मृती मानधनाचा नवा विक्रम, सलग दुसरे शतक झळकावून रचला इतिहास

Smriti Mandhana : स्मृती मानधनाचा नवा विक्रम, सलग दुसरे शतक झळकावून रचला इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामी फलंदाज स्मृती मानधनाने द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलग दुसरे शतक झळकावले. हे तिचे एकदिवसीय कारकिर्दीतील 7 वे शतक आहे. या खेळी दरम्यान, स्मृतीने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत शतकी भागीदारीही रचली.

भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जात आहे. टीम इंडियाने पहिला एकदिवसीय सामना जिंकला असून मालिकेतील दुसरा वनडे सामना आज (दि.19) खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधनाने या सामन्यात भारताकडून शतक झळकावत एक खास विक्रम केला. तिने मिताली राजची बरोबरी केली आहे.

स्मृती मंधानाची उत्कृष्ट फलंदाजी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्मृतीने अप्रतिम फलंदाजी केली. तिने डावाच्या सुरुवातीपासूनच दमदार फलंदाजीचा नमुना सादर केला आणि 103 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. तिने आपल्या खेळीत 12 चौकार आणि एक षटकार मारला. मागील सामन्यातही तिने 117 धावांची खेळी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग दोन शतके झळकावणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिच्या आधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाही भारतीय महिला खेळाडूला सलग दोन शतके झळकावता आलेली नाहीत.

मिताली राजची बरोबरी

स्मृती मानधनाने वनडे कारकिर्दीतील 7 वे शतक झळकावून मिताली राजची बरोबरी केली आहे. मितालीच्या नावावर वनडेमध्ये 7 शतके आहेत. आता स्मृती मानधनाने आणि मिताली राज या भारतासाठी संयुक्तपणे सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावणा-या महिला खेळाडू आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news