Kane Williamson | विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर केन विल्यमसनने कर्णधारपद सोडले

Kane Williamson | विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर केन विल्यमसनने कर्णधारपद सोडले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क | Kane Williamson : आजपासून टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर 8 फेरीच्या सामन्यांना सुरूवात होत आहे. दरम्यान, स्पर्धेदरम्यान टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुमार कामगिरीमुळे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन कर्णधार पदावरून पायउतार झाला आहे.

स्पर्धेत न्यूझीलंडची सुमार कामगिरी

टी-20 स्पर्धेत न्यूझीलंडला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडला अफगाणिस्तानविरुद्ध 84 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर सह-यजमान वेस्ट इंडिजकडून 13 धावांनी पराभव झाला. यानंतर किवी संघाने युगांडाचा 9 गडी राखून तर पापुआ न्यू गिनी संघाचा सात विकेट राखून पराभव करूनही न्यूझीलंडला सुपर 8 फेरीपर्यंत पोहोचता आले नाही. 'क' गटातून अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजने प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

विल्यमसनने केंद्रीय करार नाकारला

T20 विश्वचषकातून न्यूझीलंडचा संघ बाहेर पडल्यानंतर केन विल्यमसनने ODI आणि T20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला. यासह त्याने विल्यमसनने 2024-25 हंगामासाठी केंद्रीय करारही नाकारला. विल्यमसनने यापूर्वीच कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. मात्र, कर्णधारपद सोडल्यानंतर आणि केंद्रीय करारातून बाहेर पडल्यानंतरही तो तिन्ही फॉरमॅटमध्ये निवडीसाठी उपलब्ध असेल, असे विल्यमसनने सांगितले.

यावेळी विल्यमसन म्हणाला, 'सर्व फॉरमॅटमध्ये संघाला प्रगती करण्यास मदत करण्याची मला खूप आवड आहे आणि मला त्यात योगदान द्यायचे आहे. न्यूझीलंडसोबत परदेशात खेळण्याची संधी मिळेल, त्यामुळे मी केंद्रीय कराराची ऑफर नाकारली आहे. न्यूझीलंडमध्ये जानेवारी महिन्यात फार कमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जाते.

ट्रेंट बोल्ट पाठोपाठ केन विल्यमसनने नाकारला केंद्रीय करार

न्यूझीलंडच्या खेळाडूंनी केंद्रीय करार नाकारणे ही नवीन गोष्ट नाही. ट्रेंट बोल्ट आणि जिमी नीशम सारख्या स्टार खेळाडूंनीही हे केले आहे, जेणेकरून ते परदेशी लीगमध्ये भाग घेऊ शकतील. न्यूझीलंड क्रिकेटच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये जोडलेल्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त देशांतर्गत सुपर स्मॅश स्पर्धा (टी-20 स्पर्धा) खेळण्यासाठी वचनबद्ध राहावे लागते. न्यूझीलंड क्रिकेटनुसार, केन विल्यमसन जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील उर्वरित सामन्यात संघासाठी उपलब्ध असेल.

विल्यमसन म्हणतो, 'न्यूझीलंडसाठी खेळणे माझ्यासाठी खूप मोलाचे आहे आणि संघाला काहीतरी परत देण्याची माझी इच्छा अजूनही कमी झालेली नाही. मात्र, क्रिकेटबाहेरील माझे आयुष्य बदलले आहे. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवा. त्यांच्यासोबतचे अनुभव स्वदेशात असोत की परदेशात, हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.

केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय कामगिरी

केन विल्यमसनने आतापर्यंत न्यूझीलंडकडून 100 कसोटी, 165 एकदिवसीय आणि 93 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्याने 54.98 च्या सरासरीने 8743 धावा केल्या आहेत. यात त्याने 32 शतके आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विल्यमसनच्या नावावर 48.64 च्या सरासरीने 6810 धावा आहेत. केन विल्यमसनने वनडेमध्ये 13 शतके आणि 45 अर्धशतके झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये विल्यमसनने 33.44 च्या सरासरीने आणि 18 अर्धशतकांच्या मदतीने 2575 धावा केल्या आहेत. विल्यमसनने 40 कसोटी (22 विजय, 10 पराभव), 91 एकदिवसीय (46 विजय, 40 पराभव) आणि 75 T20 सामने (39 विजय, 34 पराभव) न्यूझीलंडचे नेतृत्व केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news