मुख्य प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीर एकमेव अर्जदार, आज मुलाखत

गाैतम गंभीर
गाैतम गंभीर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताचे पुढील मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरची (Gautam Gambhir) बिनविरोध निवड केली जाणार आहे, कारण या पदासाठी गंभीर एकमेव अर्जदार आहे. क्रिकेट सल्लागार समिती (CAC) कडून आज (दि. १८) गंभीरची मुलाखत घेतली जाणार आहे.

राहुल द्रविड टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेनंतर मुख्‍य प्रशिक्षक पद सोडणार आहेत. त्‍यांच्‍यानंतर मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची (Gautam Gambhir) नियुक्ती निश्चित झाली आहे. गौतम गंभीरची नियुक्ती येत्या काही दिवसांत बीसीसीआयकडून अधिकृत केली जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) संपर्क साधल्यानंतर, गंभीर मुख्‍य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्‍वीकारण्‍यास मान्‍यता दिली आहे; परंतु विविध मागण्‍याही मांडल्या असून, बीसीसीआय या मागण्‍या मान्‍य केल्‍या असल्‍याचे वृत्त आहे.

सपोर्ट स्‍टाफ निवडीचे अधिकार आणि संघात बदलही…

रिपोर्टनुसार, सपोर्ट स्‍टाफमध्‍ये कोणाची निवड करावी, याचा अधिकार आपल्‍याकडे असावा, अशी मागणी गौतम गंभीरने केली होती. त्याची मागणी मान्य करण्यात आली असून या महिन्याच्या अखेरीस 'बीसीसीआय' गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीबाबत अधिकृत घोषणा करेल. यापूर्वी रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक असताना विक्रम राठौर यांची संजय बांगर यांच्या जागी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. द्रविडने शास्त्रीच्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्यानंतरही राठौर यांनी सपोर्ट स्टाफमध्ये आपली जागा राखण्यात यश मिळवले. सध्या पारस म्हांबरे आणि टी दिलीप हे अनुक्रमे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत. रिपोर्टनुसार गंभीर केवळ सपोर्ट स्टाफमध्येच नाही तर संघातही बदल करणार आहे.

यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये गौतम गंभीरच्‍या मार्गदर्शनाखाली कोलकाता नायट रायडर्स संघाने विजेतेपद पटकावले आहे. प्रशिक्षक म्‍हणून गंभीरच्‍या कामाचे कौतुक झाले आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना गंभीर म्‍हणाला होता की, मला भारतीय संघाचे प्रशिक्षक व्हायला आवडेल. तुमच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. तुम्ही 140 कोटी भारतीयांचे आणि जगभरातील लोकांचे प्रतिनिधित्व करत आहात,".

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news