सुपर-८ मध्ये भारताचे सामने ठरले; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

सुपर-८ मध्ये भारताचे सामने ठरले; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धा आता सुपर-८ मध्ये पोहोचली आहे. साखळी फेरीतील ३८ सामने खेळले गेले आहेत. सुपर-८ चे आठ संघ निश्चित झाले आहेत. ही फेरी १९ जूनपासून सुरू होणार आहे. या विश्वचषकात २० संघ खेळण्यासाठी आले होते, ज्यांची प्रत्येकी पाच गटात विभागणी करण्यात आली होती. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर-८ मध्ये पोहोचले असून या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे.

या टी २० विश्वचषकातही काही मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. अफगाणिस्तानने न्यूझीलंडसारख्या मोठ्या संघाला बाहेरचा रस्ता दाखवला, तर अमेरिकेमुळे पाकिस्तान संघाला गाशा गुंडाळावा लागला. यावेळी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकासारखे काही माजी चॅम्पियन संघ सुपर-८ मध्ये दिसणार नाहीत. त्यांच्या जागी अमेरिका आणि अफगाणिस्तानसारख्या नव्या आणि बलाढ्य संघांनी आपले स्थान निर्माण केले आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, अमेरिका, इंग्लंड आणि बांगलादेश सुपर-८ साठी पात्र ठरले आहेत.

१९ जूनपासून सुपर-८ फेरी सुरू

सुपर-८ फेरीची सुरुवात १९ जून रोजी अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने होईल. या फेरीत दोन गट आहेत. एका गटातील एक संघ तीन सामने खेळेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने २६ आणि २७ जून रोजी आणि अंतिम सामना २९ जून रोजी बार्बाडोसमध्ये खेळवला जाईल. पाहा सुपर-८ चे वेळापत्रक…

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news