ICC T20 WC : वरूण राजाच्या खेळीमुळे भारत-कॅनडा सामना रद्द

ICC T20 WC : वरूण राजाच्या खेळीमुळे भारत-कॅनडा सामना रद्द
Published on
Updated on

फ्लोरिडा; वृत्तसंस्था : भारत-कॅनडा यांच्यातला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिले गेले आणि टीम इंडिया 7 गुणांसह सुपर-8 मध्ये पोहोचली. कॅनडाने 4 सामन्यांत 3 गुणांसह स्पर्धेचा निरोप घेतला. या 'अ' गटातून अमेरिका हा सुपर-8 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ आहे.

'अ' गटात अव्वल स्थान पटकावल्यानंतर भारतीय संघ शनिवारी कॅनडाविरुद्ध खेळणार होता. फ्लोरिडा येथे हा सामना होणार होता. तेथे शुक्रवारी अमेरिका व आयर्लंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील पॅकअप निश्चित झाले. त्यामुळे भारत-कॅनडा लढतीवर पावसाचे सावट होते. सायंकाळी 7 वाजेपर्यंत खेळपट्टीवरील कव्हर्स काढले गेले नव्हते; परंतु पावसाने विश्रांती घेतली होती. नाणेफेकीलाही विलंब झाला. सामनाधिकारी व अम्पायर यांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर नापसंती दर्शवली आणि 9 वाजता पुन्हा पाहणी केली गेली आणि हा सामना रद्द झाल्याची घोषणा झाली.

सुपर-8 चे वेळापत्रक :

20 जून – अफगाणिस्तान वि. भारत, किंग्स्टन ओव्हल : रात्री 8 वा.
20 जून – ऑस्ट्रेलिया वि. बांगला देश , नॉर्थ स्टँड : पहाटे 6 वा.
22 जून – भारत वि. बांगला देश, नॉर्थ स्टँड : रात्री 8 वा.
22 जून – अफगाणिस्तान वि. ऑस्ट्रेलिया, किंग्स्टन : पहाटे 6 वा.
24 जून – ऑस्ट्रेलिया वि. भारत, सेंट ल्युसिया : रात्री 8 वा.
24 जून – अफगाणिस्तान वि. बांगला देश, किंग्स्टन : पहाटे 6 वा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news