ICC Men’s T20 World Cup, 2024 : ‘थरारक’ विजयाने द. आफ्रिका ‘सुपर-8’ मध्‍ये!, शेवटच्‍या षटकात काय घडलं?

टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेत सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश संघ आमने-सामने होते. शेवटच्‍या षटकापर्यंत रंगलेल्‍या या सामन्‍यात दक्षिण आफ्रिकेने चार धावांनी विजय मिळवला.
टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेत सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश संघ आमने-सामने होते. शेवटच्‍या षटकापर्यंत रंगलेल्‍या या सामन्‍यात दक्षिण आफ्रिकेने चार धावांनी विजय मिळवला.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेत सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश संघ आमने-सामने होते. शेवटच्‍या षटकापर्यंत रंगलेल्‍या या सामन्‍यात दक्षिण आफ्रिकेने चार धावांनी विजय मिळवला. विश्वचषक स्‍पर्धेतील सलग तिसर्‍या विजयामुळे दक्षिण आफ्रिका संघाने सुपर-8 मध्‍ये धडक मारली आहे. जाणून घेवूया सोमवारी झालेल्‍या थरारक सामन्‍यातील शेवटच्‍या षटकात नेमकं काय घडलं या विषयी…

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 113 धावा केल्या. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेची ही सर्वात कमी धावसंख्या ठरली. याआधी 2007 मध्ये भारताविरुद्ध संघाने दक्षिण आफ्रिका संघाने 20 षटकात 9 गडी गमावून 116 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने 20 षटकांत सात गडी गमावून 109 धावा केल्या. अखेरच्या षटकात बांगलादेशला विजयासाठी ११ धावांची गरज होती. कर्णधार मार्करामने केशव महाराजांवर विश्वास व्यक्त करत चेंडू त्‍याच्‍यावर अखेरच्‍या षटकाची जबाबदारी सोपवली.

शेवटच्‍या षटकात काय घडलं?

  • पहिला चेंडू : केशव महाराज याने पहिलाच चेंडू वाईड टाकला. आता सहा चेंडूत केवळ १० धावांचे बांगलादेश समोर लक्ष्‍य होते
  • दुसरा चेंडू : झाकेर अलीने जोरदार फटका लगाव दोन धावा केल्‍या.
  • तिसरा चेंडू : झाकेर महाराजच्‍या फिरकीच्‍या जाळ्यात अडकला. त्‍याने मार्करामकडे सोपा झेल दिला.
  • चौथा चेंडू : तस्‍किन अहमद खेळण्‍यासाठी आला. त्‍याने एक धाव काढत महमुदुल्‍लाहकडे स्‍टाईक दिला.
  • पाचवा चेंडू : महमुदुल्‍लाह याने मार्करामकडे झेल दिला.
  • सहावा चेंडू : शेवटच्या चेंडूवर संघाला सहा धावांची गरज होती तस्किनने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला; पण त्याला यश आले नाही. त्याने एक धाव घेतली. महाराज याने कर्णधाराचा विजय सार्थ ठरवत दक्षिण आफ्रिकेला चार धावांनी विजय मिळवून दिला.

क्लासेन आणि मिलरच्‍या भागीदारीने दक्षिण आफ्रिकेला तारले

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्‍याच षटकात तनझीम हसन साकिब याने रीझा हेंड्रिक्स याला शून्‍या धावावर एलबीडब्ल्यू केले. यानंतर क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स झटपट बाद झाले. पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिका संघाने केवळ २५ धावांवर चार विकेट गमावल्‍या होत्‍या. टी-20 विश्वचषकातील पॉवरप्लेमधील ही त्याची तिसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली. नंतर हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी आघाडी घेतली. दोघांमधील पाचव्या विकेटसाठी त्याने मिलरसोबत ७९ धावांची मोठी भागीदारी केली. तस्किन अहमद याने ही भागीदारी मोडली. 102 धावांवर क्लासेनला बोल्ड केले.त्‍याने ४६ धावांचे योगदान दिले. यानंतर लगेचच मिलर २८ धावा करून बाद झाला. या सामन्यात मार्को जॅन्सन आणि केशव महाराज यांनी अनुक्रमे पाच आणि चार धावा केल्या. दोघेही नाबाद राहिले. बांगलादेशकडून तनझिमने तीन तर तस्किनने दोन गडी बाद केले. त्याचवेळी रिशाद हुसेनला यश मिळाले.

बांगलादेशचा डाव 109 धावांवर आटोपला

११४ धावांचे माफक आव्‍हानाचा पाठलाग करताना बांगला देशचीही सुरुवात खराब झाली. नऊ धावांवर द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडाने संघाला पहिला धक्का दिला. त्याने तनजीद हसनला डी कॉककरवी झेलबाद केले.यानंतर केशव महाराजांनी लिटन दासला तंबूत धाडले. नजमुल हसन शांतोने 14 धावा, शाकिब अल हसनने तीन धावा, तौहीद हृदयने 37 धावा, महमुदुल्लाहने 20 धावा, झाकीर अलीने आठ धावा केल्या. रिशाद हुसेन आणि तस्किन अहमद एक धाव घेत नाबाद राहिले. केशव महाराजने दक्षिण आफ्रिकेकडून तीन बळी घेतले.कागिसो रबाडा आणि ॲनरिक नोर्टजे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news