लक्ष्य सेन-पीव्ही सिंधू परदेशात प्रशिक्षण घेणार, क्रीडा मंत्रालयाने दिली मंजुरी | पुढारी

लक्ष्य सेन-पीव्ही सिंधू परदेशात प्रशिक्षण घेणार, क्रीडा मंत्रालयाने दिली मंजुरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय बॅडमिंटन खेळाडू लक्ष्य सेन आणि पीव्ही सिंधू ऑलिम्पिक तयारीचा भाग म्हणून अनुक्रमे फ्रान्स आणि जर्मनीमध्ये प्रशिक्षण घेणार आहेत. क्रीडा मंत्रालयाने याला मान्यता दिली आहे. सेनने मार्सेल, फ्रान्स येथे 12 दिवसांच्या प्रशिक्षण सत्रासाठी आर्थिक मदत मागितली होती. तो 8 ते 21 जुलै दरम्यान द हॅले डेस स्पोर्ट्स परमेन्स येथे त्याचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसोबत प्रशिक्षण घेणार आहे. तर, सिंधू जर्मनीतील सारब्रुकेन येथील हर्मन-न्यूबर्गर स्पोर्ट्स स्कूलमध्ये प्रशिक्षण घेणार आहे. पॅरिसला जाण्यापूर्वी ती तिच्या प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसोबत महिनाभर सराव करणार आहे.

मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, “क्रीडा मंत्रालयाच्या लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) अंतर्गत, त्याच्या (लक्ष्य-सिंधू) विमान भाडे, बोर्डिंग/निवास खर्च, स्थानिक वाहतूक शुल्क, व्हिसा शुल्क यावरील खर्चाची परतफेड केली जाणार आहे.

बैठकीदरम्यान, क्रीडा मंत्रालयाने टेबल टेनिसपटू श्रीजा अकुला आणि तिरंदाज टिशा पुनिया यांच्या उपकरणे खरेदीसाठी, परवानगी दिली. गोल्फ खेळाडू अदिती अशोक आणि जलतरणपटू आर्यन नेहरा यांच्या विविध स्पर्धांच्या प्रवासासाठी मदतीसाठी केलेली मागणीला मंजुरी दिली.

क्रीडा मंत्रालयाने टेबल टेनिसपटू हरमीत देसाई आणि महिलांच्या 4×400 रिले संघाचा टॉप्स कोअर गटात समावेश करण्यास आणि कुस्तीपटू निशा (68 किलो) आणि रितिका (76 किलो) यांना कोर गटात पदोन्नती देण्यासही मान्यता दिली. मंत्रालयाने लॉस एंजेलिस आणि ब्रिस्बेन येथे अनुक्रमे 2028 आणि 2032 ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करून आगामी गोल्फर कार्तिक सिंगला टॉप्स डेव्हलपमेंटमध्ये समाविष्ट केले.

Back to top button