MS Dhoni : धोनीने सांगितले त्याचे आवडते ठिकाण कोणते? | पुढारी

MS Dhoni : धोनीने सांगितले त्याचे आवडते ठिकाण कोणते?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सेलिब्रिटी असो किंवा खेळाडू सुट्टीचा आनंद घेण्यासाठी प्रत्येकाचे एक आवडीचे ठिकाण असते. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोणते शहर आवडते माहित आहे का? चेन्नई सुपर किंग्जच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये धोनीने स्वत: याबाबत सांगितले आहे.

आयपीएल २०२४ ठळक मुद्दे

  • १८ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे.
  • CSK हा आपला शेवटचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळणार आहे.
  • सीएसके संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असून १३ सामन्यांतून ७ विजयांसह १४ गुण आहेत.
  • महेंद्रसिंग धोनीने आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून चमकदार कामगिरी केली आहे.
  • दुखापतग्रस्त असूनही धोनी आयपीएलमध्ये खेळत आहे.

धोनीला ‘या’ शहरात सुट्टी घालवायला आवडते

महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) जगातील त्याचे आवडते पर्यटन स्थळ अमेरिका आहे, असे सांगितले. चित्तथरारक लँडस्केप्स आणि समृद्ध संस्कृतीसाठी अमेरिका हे अनेकांसाठी स्वप्नवत ठिकाण आहे. धोनीला मात्र येथे गोल्फ, खाद्यपदार्थ आणि येथील मित्रासोबत वेळ घालवायला आवडतो.

धोनी काय म्हणाला…

चेन्नई सुपर किंग्जच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये धोनीने (MS Dhoni) अमेरिकेतील न्यू जर्सी शहर त्याचे आवडते ठिकाण असल्याचे सांगितले. सुट्टीमध्ये तो न्यू जर्सी येथे त्याच्या मित्राच्या घरी जातो आणि तेथे तासनतास गोल्फ खेळतो. सुट्टीच्या दिवसात दुसरे काही करायला आवडत नाही, पण गोल्फ खेळायला आणि जेवणाचा आनंद घ्यायला आवडतो. यामुळे खूप शांतता आणि आराम वाटतो, असे धोनीने सांगितले.

अमेरिका का निवडली?

धोनीने सांगितले की, आम्ही चार ते साडेचार तास गोल्फ खेळतो. त्यानंतर जेवणाचा आनंद घेतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच करतो. त्यामुळे काहीही न करता फक्त गोल्फ खेळणे आणि १५-२० दिवस जेवणाचा आनंद घेणे चांगले वाटते. जर क्लबमधील सदस्यांमध्ये स्पर्धा असेल तर ते त्यात भागही घेतात. धोनीने आपल्या मित्राचे नाव मात्र सांगितलेले नाही. तिथे मित्रासोबत त्याला फारसे लोक ओळखत नाहीत, असे धोनीने म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button