IPL 2024 : इम्पॅक्ट नियमाचा पुनर्विचार करणार : बीसीसीआय

IPL 2024 : इम्पॅक्ट नियमाचा पुनर्विचार करणार : बीसीसीआय

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : IPL 2024 : यंदाच्या हंगामात आयपीएलमध्ये लागू करण्यात आलेला इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमाचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनी या नियमावर टीका केली होती, याची दखल घेत आम्ही या नियमाचा पुनर्विचार करू, असे बीसीसीआयने म्हटले आहे.

आयपीएलमध्ये जेव्हापासून इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू करण्यात आला आहे तेव्हापासून 200 धावांचे टार्गेटदेखील प्रतिस्पर्धी संघ आरामात चेस करताना दिसून येत आहे. या नियमावर मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. (IPL 2024)

आता बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम गेल्या हंगामात लागू करण्यात आला होता. या नियमानुसार संघांना सामना सुरू असताना आपल्या संघात एक बदली खेळाडू खेळवण्याची मुभा देण्यात आली होती. (IPL 2024)

रोहितने घेतली उघड भूमिका

रोहित शर्माने इम्पॅक्ट प्लेअरचा अष्टपैलू खेळाडूंवर नकारात्मक इम्पॅक्ट पडेल, अशी भीती व्यक्त केली होती. त्याने एका मुलाखतीत इम्पॅक्ट प्लेअर नियमावर बोलताना आपलं मत व्यक्त केलं. तो म्हणाला की, इम्पॅक्ट प्लेअर नियम हा योग्य आहे असं मला वाटत नाही. क्रिकेट हा 11 खेळाडूंनी खेळला जातो 12 खेळाडूंनी नाही. त्यानं शिवम दुबेचं उदाहरण दिलं अन् म्हणाला की, शिवम दुबेला इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे गोलंदाजी करण्याची गरजच उरलेली नाही. यामुळे अष्टपैलू खेळाडूंच्या विकासावर मोठा परिणाम होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news