Yuzvendra Chahal : युझवेंद्र चहलचा आयपीएलमध्ये लाजिरवाणा विक्रम! | पुढारी

Yuzvendra Chahal : युझवेंद्र चहलचा आयपीएलमध्ये लाजिरवाणा विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Yuzvendra Chahal : पंजाब किंग्ज विरुद्ध खेळताना स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. यासह त्याने एक खास द्विशतक झळकावले असून अशी कामगिरी करणारा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा गोलंदाज बनला आहे.

शनिवारी राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात आरआरचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत पंजाब किंग्जला 20 षटकांत 8 गडी गमावून 147 धावांवर रोखले.

चहलचा लाजिरवाणा विक्रम (Yuzvendra Chahal)

युझवेंद्र चहल हा आयपीएल आणि टी-20 क्रिकेटमधील भारताचा महान फिरकी गोलंदाज आहे. आयपीएल 2024 मध्येही तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. मात्र, त्याची कुटाई देखील होत असल्याचे दिसत आहे. त्यातच तो आता आयपीएलच्या इतिहासात 200 षटकार खाणारा दुसरा गोलंदाज बनला आहे.

चहलने आयपीएलमधील आपल्या 151 व्या सामन्यात हा लाजिरवाणा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. त्याने आयपीएलमध्ये एकूण 3305 चेंडू टाकले आहेत. यादरम्यान त्याला 200 चेंडूत षटकार मारण्यात आले. चहलशिवाय पियुष चावलाने (211) सर्वाधिक षटकार खाल्ले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज (Yuzvendra Chahal)

पियुष चावला : 211 षटकार
युझवेंद्र चहल : 200 षटकार
रवींद्र जडेजा : 198 षटकार
आर अश्विन : 189 षटकार
अमित मिश्रा : 182 षटकार

चहलचा आयपीएलमधील विक्रम

युझवेंद्र चहलचा आयपीएलमधील विक्रम खूपच चांगला आहे. या मोसमात त्याने 6 सामन्यात एकूण 11 विकेट घेतल्या आहेत. तो पर्पल कॅपच्या शर्यतीतही आहे. आयपीएलमध्ये चहलने 151 सामन्यात 21.31 च्या सरासरीने आणि 7.66 च्या इकॉनॉमीने 198 विकेट घेतल्या आहेत. 40 धावांत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलच्या इतिहासात चहलच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत. तो आयपीएलमध्ये 200 विकेट्सच्या अगदी जवळ आहे आणि असे करणारा तो पहिला गोलंदाज देखील बनू शकतो.

Back to top button