MI vs SRH : हैदराबादची ऐतिहासिक कामगिरी; मुंबईला विजयासाठी 278 धावांचे लक्ष्य | पुढारी

MI vs SRH : हैदराबादची ऐतिहासिक कामगिरी; मुंबईला विजयासाठी 278 धावांचे लक्ष्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. च्या ट्रॅव्हिस हेडने 62, अभिषेक शर्माने 63, एडन मार्करामने 42 आणि हेनरिक क्लासेनने 80 धावांच्या जोरावर 3 विकेट गमावून 277 धावा केल्या. या सामन्यात मार्कराम आणि क्लासेन नाबाद राहिले. (MI vs SRH)

हैदराबादला अभिषेक शर्माच्या रूपात तिसरा धक्का

सामन्याच्या 11 व्या षटकात मुंबईचा फिरकीपटू पियुष चावलाने नमन धिरकरवी अभिषेला बाद केले. अभिषेक आपल्या आक्रमक खेळीत 23 बॉलमध्ये 63 धावांची शानदार खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 7 षटकार लगावले.

हैदराबादची दुसरा धक्का; ट्रॅव्हिस हेड बाद

हैदराबादला दुसरा धक्का ट्रॅव्हिस हेडच्या रूपाने बसला. आठव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जेराल्ड कोएत्झीने त्याला नमन धीरकरवी झेलबाद केले. हेडने २४ चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या.

हैदराबादला पहिला धक्का; मयंक अग्रवाल बाद

हैदराबादला पहिला धक्का 45 धावांवर बसला. पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्याने मयंक अग्रवालला टिम डेव्हिडकरवी झेलबाद केले. या सामन्यात अग्रवालला केवळ 11 धावा करता आल्या. त्याचवेळी त्याचा सहकारी फलंदाज ट्रॅव्हिस हेड दमदार खेळी करत आहे.

दोन्ही संघात बदल

आयपीएलच्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याने सांगितले की, ल्यूक वुडच्या जागी युवा गोलंदाज क्वेना मफाका संधी दिली आहे. तर सनरायझर्स हैदराबादने संघात दोन बदल केले आहेत. मार्को जॉन्सनच्या जागी ट्रेव्हिस हेड तर टी नटराजनच्या जागी जयदेव उनाडतला संधी मिळाली आहे.

सचिनने रोहितला दिली २०० क्रमांकाची जर्सी

आज रोहित शर्मा कारकिर्दीतील 200 वा आयपीएल सामना खेळताना दिसणार आहे. सामन्याआधी सचिन तेंडुलकरने त्याला 200 क्रमांकाची खास जर्सी भेट दिली होती. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएल विजेतेपदावर कब्जा केला.

संघ :

सनराइजर्स हैदराबाद : ट्रैविस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडेन मार्कराम, हेरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज़ अहमद, पॅट कमिंस (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मारकंडे, जयदेव उनादकट.

इम्पैक्ट प्लेयर : नितीश रेड्डी, वाशिंगटन सुंदर, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव.

मुंबई इंडियन्स : ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेविड, गेराल्ड कोएत्ज़ी, शम्स मुलानी, पीयूष चावला, जसप्रित बुमरा, क्वेना मफाका.

इम्पैक्ट प्लेयर : डेवाल्ड ब्रेविस, रोमारियो शेफर्ड, मोहम्मद नबी, विष्णु विनोद, नेहल वढेरा.

हेही वाचा :

Back to top button