पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 RR vs LSG : आयपीएल 2024 च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 20 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 4 गडी गमावून 193 धावा केल्या. संजू सॅमसनने 82 धावांची नाबाद खेळी खेळली. प्रत्युत्तरात लखनौचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 173 धावा करू शकला. केला राहुल आणि निकोलस पूरन यांची अर्धशतके व्यर्थ गेली. राहुल ५८ धावा करून बाद झाला, तर पुरण ६४ धावा करून नाबाद राहिला. लखनौला शेवटच्या सहा चेंडूंवर विजयासाठी २७ धावांची गरज होती, पण संघाला केवळ सहा धावा करता आल्या.
IPL 2024 RR vs LSG : लखनौची खराब सुरुवात, ११ धावांवर गमावले ३ गडी
लखनौ सुपरजायंट्सने पहिल्या चार षटकात ११ धाांवर तीन विकेट गमावल्या. ट्रेंट बोल्ट याने क्विंटन डी कॉक (4) आणि देवदत्त पडिक्कल (0) यांना तंबूत धाडले. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या नांद्रे बर्जरने आयुष बडोनीला यष्टिरक्षक बटलरकरवी झेलबाद केले.
लखनौला आठव्या षटकात ६० धावांवर चौथा धक्का बसला. युझवेंद्र चहलने आपल्या पहिल्याच षटकात दीपक हुडाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तो १३ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २६ धावा करून बाद झाला. आठ षटकांनंतर लखनौची धावसंख्या चार विकेटवर ६१ धावा केल्या. यानंतर निकोलस पुरन आणि केएल राहुल यांनी डाव सावरला. लखनौ सुपर जायंट्सने 14 षटकांनंतर 4 गडी गमावून 129 धावा केल्या आहेत. संघाला 36 चेंडूत 65 धावा हव्या आहेत. केएल राहुलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ३४ वे अर्धशतक झळकावले. यानंतर लखनौच्या निकोलस पुरन याने १७ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत ३० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
१७ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर संदीप शर्माने केएल राहुलला ध्रुव जुरेल करवी झेलबाद केले. केएल राहुल याने ४४चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार पटकावत ५८ धावा केल्या. १८ व्या षटकात राजस्थानचा फिरकीपटू अश्विनने स्टोइनिस याला ध्रुव जुरेल करवी झेलबाद केले. स्टॉइनिस केवळ ४ चेंडूत ३ धावा केल्या. केएल राहुल बाद झाल्यानंतर लखनाैच्या हातून सामना निसटला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान संघाची सुरुवात खराब झाली. जोस बटलर 11 धावा करून बाद झाला तर यशस्वी जैस्वाल 24 धावा करून बाद झाला. यानंतर सॅमसनने रियान परागसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. राजस्थानला 142 धावांवर तिसरा धक्का बसला. परागचे अर्धशतक हुकले आणि 29 चेंडूत 43 धावा करून तो बाद झाला. या खेळीत त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले. शिमरॉन हेटमायर काही विशेष करू शकला नाही आणि पाच धावा करून बाद झाला.
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, रायन पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, आर अश्विन, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल.
केएल राहुल, क्विंटन डी कॉक, देवदत्त पडिक्कल, आवेश खान, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, नवीन उल हक, यश ठाकूर.